सोमवार, १० एप्रिल, २०१७

भाजीविक्री करणाऱ्या युवकाने केले वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान

मद्यमवर्गीय कुटुंबामध्येही रुजतोय आधुनिक दृष्टिकोण : चर्होलीतील रासकर कुटुंबियांची समाजिक जाणीव

श्रीकांत बोरावके 

आपल्या रोजच्या जीवनाची सकाळ व सूर्यास्त केवळ उदर्निवाह करण्यात घालवावा लागणाऱ्या मध्यमवर्गीय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला समाजातील विविध घटनांमध्ये योगदान देण्यास वेळेच नसतो.त्यांचे सामाजिक योगदान ही कमी असते अशी ओरड नेहमीच केली जाते.मात्र या विचारसरणीलाच मागे टाकेल अशी घटना चर्होली ( ता.हवेली) येथे घडली आहे. येथील राहुल रासकर या भाजी विक्री करणाऱ्या तीस वर्षीय युवकाने आपल्या वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करत मध्यमवर्गीय व धार्मिक कुटुंबातही नेत्रदाना सारखा आधुनिक दृष्टिकोण रुजत असल्याचे दाखवून दिले असून त्यांच्या या निर्णयाचे समाजातून कौतुक होत आहे.
   चऱ्होलीतील जुन्या पिढीतील शेतकरी तुकाराम रासकर यांचे वृद्धापकाळाने निधन ( दि.21)रोजी निधन झाले.आपल्या वडिलांचे निधनाचा शोक आवरुन वडिलांचे नेत्रदान करण्याचा निर्णय त्यांचा मुलगा राहुल रासकर यांनी घेतला त्यांच्या या निर्णयाला मृत रासकर यांच्या पत्नी इंदुबाई रासकर,मूली लक्ष्मी फूलसुंदर,संगीता भुजबळ,लक्ष्मी कुदळे,कविता भुजबळ,सुन मनीषा रासकर व नातू खेड नगरपरिषदेचे नगरसेवक संदीप रासकर,संतोष रासकर या सर्वानी या विचाराला पाठिंबा दिला.
  नेत्रदान व अवयव दानाचे  महत्व जाणलेल्या शिक्षक सुनील बेनके यांनी या सामाजिक उपक्रमात  पुढाकार घेत रासकर यांना योग्य मार्गदर्शन केले.नेत्रदान करण्याचा निर्णय घेतल्या नंतर आदित्य बिर्ला नेत्रपिढीचे यूनिट तासाभरात चऱ्होलीत दाखल झाले.तात्काळ मृताचे डोळे ताब्यात घेऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.परिसरात नेत्रदानाचा एक आदर्श उपक्रम या माध्यमातून रासकर कुटुंबीयांनी समाजापुढे ठेवला आहे.राहुल रासकर यांचे शिक्षण अवघे बारावी असून ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात.आपणही नेत्रदान करावे ही इच्छा त्यांच्या मनात कायम घर करुण होती.ती इच्छा वडिलांचे नेत्रदान करुण पूर्ण झाली असली तरी यावरच न थांबता सर्व कुटुंबाचेही मरणोत्तर नेत्रदान करण्याचाही त्यांनी संकल्प केला आहे. सदर उपक्रमास त्यांना जितूभाई शहा ,सामाजिक कार्यकर्ते पंडित खेडकर आणि आदित्य बिर्ला नेत्रपेढी यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी उपस्थित नातेवाईक व ग्रामस्थांनाही या विधायक उपक्रमाचे स्वागत केले व येथून पुढे आमच्या कुटुंबियांच्या वतीने असा उपक्रम चालूच ठेवू अशी भावना राहुल रासकर यांनी व्यक्त केली.तर सध्या देशात नेत्रदानाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे परंतु त्या मानाने नेत्रदान होत नाही आमच्या गावातील राहुल  रासकर यांनी आपल्या वडिलांचे नेत्रदान करून चऱ्होली नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श निर्माण केला  आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो.असे मत  सावतामाळी सोसायटीचे संचालक प्रवीण काळजे यांनी व्यक्त केले.
अवयव दानाच्या माध्यमातून तो अजूनही हे जग पाहतोय
 
चिंबळीतील पाटोळे कुटुंबीयांचा आदर्श ; ग्रामीण भागातही रुजतेय अवयवदान संकल्पना  

श्रीकांत बोरावके 
 
    अवयव रुपी उरावे' ही नवी उक्ती सद्या रुड होत असून.या अवयव दान संकल्पनेत शहराबरोबरच खेडी ही मागे नसल्याचे दिसून येत असून अवघ्या चार महिन्यांपूर्वी घडलेल्या एका घटनेने हे अधोरेखित केले आहे.ही घटना आहे पुण्यातून दुसरे यशस्वी ठरलेल्या हृदय प्रत्यार्पण शस्त्रक्रियेची.२५ एप्रिल रोजी ग्रीन कॅरिडोरच्या माध्यमातून एका तेवीस वर्षाच्या ब्रेन डेड झालेल्या तरुणाचे हृद्य सात मिनिटात पुण्याहून दिल्लीला पाठविण्यात आले.आणि दिल्लीतील तरुणाचा जीव वाचला.या साऱ्यात हृद्य दान करण्याचा निर्णय घेणाऱ्या एका कुटुंबाची हृदयदावक कहाणी.अपघातात गंभीर जखमी होत मेंदूला मार लागून कोमात गेलेला आपला मुलगा ब्रेन डेड झाल्याने जगू शकत नाही असे डॉकटरने सांगितल्या नंतर पायाखालची जमीनच सरकलेल्या त्या तेवीस वर्षांच्या तरुणाच्या आई व पत्नीला तो आता या जगात अवघ्या काही तासांचा सोबती आहे.हे समजल्या नंतर काय अवस्था झाली असेल हे खरं तर शब्दात व्यक्त न करता येणी जोगी.अशा अस्वस्थ अस्वस्थेतही तुम्ही तुमच्या मुलाच्या शरीरातील अवयव दान करून इतर काही गरजू रुग्णांना जीवदान देऊ शकता या डॉक्टरांच्या सल्ल्याचा विचार करत काळजावर दगड ठेवत एका आईने व पत्नीने आपला जीवलग अखेरची घटका मोजत असताना त्याचे इतर रुग्णांना उपयोगी ठरणारे सहा अवयव दान करत सहा रुग्णांना जीवदान देणाचा आदर्श निर्णय घेतला.या निर्णयामुळे तो जरी या जगात नसला तरी त्याच्या मुळे सहाजण हे जग पाहू शकल्याचे समादान त्यांना आहे.हि घटना आहे अवघ्या चार महिन्यांपूर्वी मलठण येथे कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिंबळी ( ता.खेड ) येथील तेवीस वर्षाच्या सचिन पाटोळे या तरुणाची.सचिनला अपघातात गंभीर इजा झाल्याने पुण्याच्या रुबी हॉल क्लीनिक मध्ये दाखल केले होते.सहा दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर ही सचिनला वाचविण्यात यश आले नव्हते अखेर २५एप्रिल दरम्यान त्याचा ब्रेनडेड झाल्याचे डॉकटरने सांगितले.तेव्हा त्याच्या अवयवदान करायचा डॉकटरांनी दिलेला सल्ला मान्य करत त्याची आई सुषमा पाटोळे व पत्नी श्रद्धा पाटोळे यांनी त्याचे अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेत सहा जणांना जीवदान देऊ केले.वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याने घराची सर्व जबाबदारी सचिनवरच येऊन पडली होती.त्याच्या संसार वेलीला एक मुलगा ही होता.अपघातात मृत्यू आल्याने घरवरचा आधारच गमावून बसलेले पाटोळे कुटुंबीय आपले दुःख बाजूला सारून समाजाच्या हितासाठी आपल्या मुलाचे इतर रुग्णांना उपयोगी ठरतील असे अवयव दान करते तेव्हा समाजात असलेल्या गरीब,श्रीमंत या दरी दूर हटताना दिसतात.सचिनचे हृदय दिल्लीतील तरुणाला  त्याच्या  इतर अवयवांपैकी एक किडनी, यकृत आणि दोन डोळे 'रुबी हॉस्पिटल'च्या पेशंटांना, उर्वरीत किडनी आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील पेशंटला देण्यात आली.
     अवघ्या चार महिन्यांच्या या घटनेकडे पाहता अवयव दान संकल्पना ग्रामीण भागातही रुजत असून अधिक अधिक लोक समाजासाठी आपल्या पश्चात अवयव रूपाने उरावे या हेतूने अवयव दान करण्यासाठी पुढे येताना दिसतात.२९ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर रोजी होत असलेल्या अवयव दानजनजागृती मोहिमेमुळे दातृत्वाची भावना असलेले पाटोळे कुटुंबियांसारखी अशी ग्रामीण भागातील अनेक कुटूंबे पुढे येतील हीच नव्या समृद्ध समाजाच्या नांदी ठरेल.सरकारी धोरणानुसार दान करणाऱ्यांना कुठलाही मोबदला मिळत नसल्याने आदर्श निर्णय घेणाऱ्या पाटोळे परिवाराची देखील इतर कुटुंबियांसारखी फरपट होत असून आजही या कुटुंबाला नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे.यामुळे शासकीय धोरणात काही अंशी बदल करत अशा कुटुंबाना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिल्यास असे निर्णय घेणाऱ्या कुटुंबांचा तो सन्मान ठरेल असा मत प्रवाह समाजातून उमटताना दिसून येतो.( वार्ताहर )
 मरावे परी
प्रतिक्रिया :

त्याच्या मुळे दुसरा हे जग पाहू शकल्याचा आनंद

सचिन पाटोळे आता या जगात अवघ्या काही तासांचा सोबती आहे हे समजल्या नंतर त्याचे अवयव दान करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला मृत्यू पश्चात तो अवयव रूपाने या जगात राहील भावनेने आम्ही त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.त्याच्या जाण्याने आम्ही आमचे सर्वस्वच गमावून बसलो आहे पण त्याच्या अवयव दानामुळे सहा जणांना जीवदान लाभल्याने मनाला एक प्रकारचे समादान लाभते

:- सुषमा पाटोळे,श्रद्धा पाटोळे,मृत पाटोळे यांच्या आई व पत्नी 

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

कळा ज्या लागल्या जीवा

                     कोणा एका श्रीमंताच पोर अनवाणी कडक ऊन्हात फिरायला निघाल आणि कडक ऊन्हात त्याच ते पाय पोळुन निघाले तेव्हा ते घरि येऊन वङिलांना म्हणाले कि साऱ्या रस्त्यावर चांमडे अंथरा जेणे करून माजे पाय पोळणार नाहीत.या वर तो श्रीमंत म्हणाला अरे माझ्या सोनुल्या त्या परीस तु तुज्याच पायात चप्पल घाल जेणे करून तुजे पाय पोळणार नाहीत.खर तर गोष्ट साधी व सोपी आहे पण त्याचा मतितार्थ वेगळा घेण्याची गरज आहे.स्वताच्या पायाला चप्पल असल्याने जगाला बसणारे चटके जाणवणार नाहीत हा उपाय असला तरी ऐक पळवाटच म्हणावी लागेल सामाज्यापासून दूर जाण्याची.

                     आज राज्यावर पाणीटंचाईच भीषण संकट उभे आहे.परंतु ते आमच्या वर न ओढवल्यान आम्ही आजही धूलवड साजरी करतोय.दुष्काळाची झळ ना  कळ प.महाराष्ट्रला आणि विशेषता पुण्याला बसत नसल्याने त्याची खंत आम्हा पंताना कश्याला..! असच म्हंटल जातय 
           दुष्काळ पाहताना दिसणार द्रुष मनाला टोचत आणि तेव्हा बोचत हे कि पाणी प्रश्नावरही राजकारणाची पोळी भाजली जातेय.आज भेडसावणारा प्रश्न बिकट आहेच पण याचे सोयरे ना सुतक राजकारण्यानला आहे का असतेच तर दिमाखदार शाही थाटातील विवाह सोहळे,अभिष्टचिंतन सोहळे,साजरे करून त्या वर घोडे नाचवले नसतेच.जनतेचे प्रश्न हे A.C हॉल मधे बसून सुटत नसतात त्या साठी शेतकरयांच्या गोठयापर्यंत नाळ जोडलेलीच असावी लागते हे विसरले गेल्याचे जाणवते.

                  दुष्काळावर उपाय अनेक होते वा आहेत पाणी पंचायत,पाणलोट क्षेत्र विकास व इतरही अनेक पण यातील कोणती सूत्र अंमलात आणली गेलीत ? गेलीत ना  जलसिंचन घोटाळ्याची. आणखीनही काय वाढून ठेवलय याचीच सामान्य माणूस आशा करतोय व स्वताची झळ स्वताच सोसतोय प्रसंगी कवी भा.र.तांबे यांच्या ओळी सत्याची जाणीव करून देतात.
                            कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या
                        कुणाला काय हो त्याचे,कुणाला काय सांगाव्या                       उरी हा हात ठेउनी, उरीला शुल का जरी     
                   समुद्री चहूकडे पाणी ,पिण्याला थेंबही नाही ....! 

(प्रभात,कॉलेज कनेक्ट  २२ फेब्रु २०१३ )                                                    

तरिही प्रेमाचा गुलकंद तसाच.....!
       आमची युवा पिढी पुर्वी प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबी पञांचा वापर करत  पुढे आमच्याकडे मोबाइल आले आणि आमच्या प्रेमात आधुनिकता आली त्याहि पुढे फेसबुक,नेट आले एका likeवर प्रेमाचे बहर सुरु झाले.
          परंपरेने चालत आलेल्या काण्हेरी,मोगरयाच्या फुलांची जागा गुलाबाने कधी घेतली कळलेच नाही. पुर्वी प्रेम,लग्न व नातेसंबध जुळले जायचे आता त्याही पुढे जावुन आम्ही हि परंपराच खंडित केली. लिव  इन रिलेशनशीप हि प्रेमाची गरजच बनवली.अगोदर बघणे,पसंद करणे सहवासात राहणे योग्य असेल तरच जीवनभर सोबत राहणे हि संकल्पणा एका दृष्टिने आपल्या संस्कृतीला तडा देणारिच पण तरिही आधुनिकतेनुसार योग्यच कारण काळा बरोबर बदलण हा माणसाचा नियम आहे अथवा इतिहास जमा गोष्टिणवर भविष्यकाळ ठरत नाहि हेही तितकेच खरे आहे.
         मोगरयाच्या जागी गूलाब येवो वा सामाजीक नातेसंबध परंपरेला छेद देत रिलेशनशीप येवो तरिही येवढे माञ निच्छित कि प्रेमाचा गुलकंद पुर्वी तोच होता आणि आजही तसाच मधुर आहे......!!!!
मला मायभूमी कुठे आहे ...?

                      सुमारे पाच एक दशकांपूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हे चारच शब्द उच्चारले आणि हजारो वर्षे एका विषम 
समाज परिस्थितीच्या पोटात घुसमटलेली भावना ज्वालामुखीचा स्पोट घडवुन गेली.आज कदाचित विषय वेगळा ,व्यवस्था वेगळी असो 
वा वातावरण वेगळे असो पण हाच प्रश्न कालही तसाच होता,आजही तसाच आहे,आणि कदाचित उद्याही तसाच असेल.
                              आपली राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाटी प्रत्येक गोष्टीला विरोध करणे हा तर पायंडाच पडत चालल्याचे दिसून येते.
 आपल्या विरोधाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय याचे भानही यांना नाही.अशाच कुटील राजकारणाची झळ कमल हासन च्या विश्वरूपम ला बसली .सिनेमाला sensor  ने हिरवा कंदील दाखवला असूनही धार्मिक,राजकीय संघटनांच्या मूर्ख पणाला बळी पडाव लागत हि अतिशय खेदाची बाब आहे.या अश्या विरोधाचा फटका या आधी हि अनेक कलावंताना बसला आहे.कलेतील काही कळो ना कळो पण तरि ही विरोध करून कलाकृती रोखल्या जातात तरीही शासन मात्र मुग गिळून गप्प बसते एखाद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते तेवा हे लोकशाहीचे रक्षक गप्प का बसतात ?
                               हि परस्थिती म्हणजे या समाजच स्वास्थ ढासळत असल्याच घोतक आहे.याला अधिक खत पाणी घालण्याचा जो प्रयत्न सुरु आहे तो हाणून पाडण्याची आज गरज आहे.अन्यथा बाबा साहेबांचे हे बोल स्वातंत्र्या नंतर हि तेवडेच जिवंत रहिल्या शिवाय वेगळे काही वाटत नाही व ज्या देशाचा नागरिक संतुष्ठ नाही तो देश रसातळाला गेल्या शिवाय राहत नाही याचे भान शासनाने ठेवले पाहिजे.कारण ज्या युवा पिढि वर उद्याचा सक्षम भारत उभा आहे त्याच तरुणाईच्या स्वातंत्र्यावर गदा आल्यास हा देश महासत्ताक होणे केवळ स्वप्नच राहील.आणि याच बरोबर चांगल्या कलाकृती घडत नाही याची ओरडही सुरुच राहील.कलेला राजाश्रय असल्या शिवाय ती टिकत नाही हा इतिहास आहे.तो भविष्य काळ न व्हावा हिच अपेक्षा ..
 
प्रभात ,कॉलेज कनेक्ट  दिनांक ०७ फेब्रुवरी २०१३
नाक दाबा तोंड उघडेलच ...!
                    आता पर्यंत भारताने केवळ शांततेची कबुतरे सोडली आहेत परंतु त्याच्या  उत्तरा दाखल पाकिस्तानणे आपल्याच हद्दीत येउन आपल्याच सैन्याचे शीर छाटून नेण्याचे धाडस करणे म्हणजे पाटीमागून वार करण्या सारखेच आहे.सीमेवरील धाडस कमी कि काय म्हणूनच एक प्रकारचा धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न  मलिक यांनी केला.खर तर आजपर्यंत स्वताच्या पाकिस्तान मधेच कितेकदा त्यांच्याच खेळाडूंला ला सामना हरले म्हणून मार वा द्वेष दिला गेला आहे.त्या वेळी जर भारताने या वर वक्तव्य केली असती तर याच पाकिस्ताने त्याचा मोठा बाऊ केला असता.भारत शांतता प्रिय,संयमी देश आहे म्हणून कोणीही उठून भारता बाबत बोलावे हा पायंडाच पडला आहे.यात अमेरिका हि कमी नाही वा पाकिस्तान.
         भारता कडून होणारी सर्व मदत ,व्यापार ,वा क्रीडा सामने तात्काळ बंद करावे जेणे करून ''नाक दाबले कि जगण्यासाठी तोंड उगडलेच जाते'' त्या प्रमाणे पाकिस्तान पुढे अडचणी उभ्या राहिल्या शिवाय त्यांचा हा उधळआपट पणा थांबणार  नाही.आता वेळ केवळ येणाऱ्या संकटाना पेलण्याची नव्हे तर आव्हान देण्याची आहे.बाह्य सिमेवरी वातावरण गरम करून अंतर्गत शांतता भंग करण्याचा प्रयत्न अश्या धार्मिक  बाबींवर 'शाहरुखचे' पात्र उभे करून पाकिस्तान करत आहे.एकंदरीतच पाकिस्तानणे स्वताचे घराचे वासे मोजावे तेच भक्कम करावेत.दुसर्याच्या घराच्या वाशांची काळजी न करणेच योग्य ठरेल. 
प्रभात ,कॉलेज कनेक्ट  ०२ फेब्रुवारी २०१३
पाश्चिमात्यांचे अनुकरण कशाला ? 
                    
                   खर तर ज्या संस्कृतीचे गोडवे जगभर गायले जातात त्या भारतीय संस्कृतीत आज पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्याची परंपरा कुठून आली हेच कळत नाही.
भारतीय संस्कृतीत अशी काही सन आहेत कि त्यांचे थ्रिल अनुभवल्यास या अश्या वेगवेगळ्या डे न ची गरजच पडणार नाही.परंतु आपल्या संस्कृतीतले लावण्य न शोधता विदेश्या
प्रमाणे त्या वेगवेगळ्या वेशभूषा करून,डे साजरे करून काय हाती येत .उलट आपली संस्कारक्षम संस्कृती जाऊन बेजबाबदार संस्कृती निर्माण  करण्याला खतपाणी घातल्या सारखच नाही का ?
ज्या गोष्टींचे डे साजरे केले जातात .अश्या गोष्टी रोजच्या जीवनात जगण्या सारख्याच आहेत पण तरी हि आपण या डेज ला विशेष महत्व देताना दिसून येतो.
           आचार्य अत्र्यांच्या म्हणण्या नुसार ''ब्रिटीश लोक म्हणत कि देश देऊ पण शेक्सपियरच वाड्मय नाही ''.त्यांना आपल्या संस्कृतीच्या पाउल खुणांच कौतुक आहे.
 पण आम्हास आमच्या महत्वाच्या परंपरेचे महत्वच नाही.वंचित,पूजनीय घटकांना पुजून दिवस साजरा करण्याची परंपरा आपल्या कडे असताना वेगळे डे साजरे करण्याकडे कल का ..? 
                          पाश्चिमात्यांचे अनुकरण नको कारण हि भारतीय संस्कृती आहे.जिथे आयुष्य भर माया करणाऱ्या आईची जागा  डे मधे नसून ती हृद्यात आहे.जिथे वर्षभर राबणारया बैलाचा पोळा घालून आदर व्यक्त केला जातो,जिथे शेतीचे उंदरान पासून राखण करणाऱ्या नागाची पंचमी साजरी केली जाते.जिथे महापुरुषांच्या सन्मानार्थ शिक्षक दिन ,बालदिन साजरे केले जातात .आपण यांना महत्व न देता  पाश्चिमात्यांचे अनुकरण करून विदुषकी वस्त्रे परिधान करून,प्रेम व्यक्त करण्याला खास दिवस देऊन आपल्या सणानला जागतिक महत्व देतो का याचा विचार व्हायला हवा .खर तर आजचा तरूण प्रेम व्यक्त करण्या साठी वेलेनटाईन डे ची वाट पाहतो का..? तरी पण अश्या दिवसांनला साजरे करून आपण कोणती परंपरा जपतो..? आपण या पेक्षा आपली संस्कृती जगापुढे मांडली पाहिजे जेणे करून ते आपले अनुकरण करतील आपण नव्हे.
 
श्रीकांत बोरावके ,दिनांक  ०३ जानेवारी २०१३