सोमवार, १० एप्रिल, २०१७

भाजीविक्री करणाऱ्या युवकाने केले वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान

मद्यमवर्गीय कुटुंबामध्येही रुजतोय आधुनिक दृष्टिकोण : चर्होलीतील रासकर कुटुंबियांची समाजिक जाणीव

श्रीकांत बोरावके 

आपल्या रोजच्या जीवनाची सकाळ व सूर्यास्त केवळ उदर्निवाह करण्यात घालवावा लागणाऱ्या मध्यमवर्गीय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला समाजातील विविध घटनांमध्ये योगदान देण्यास वेळेच नसतो.त्यांचे सामाजिक योगदान ही कमी असते अशी ओरड नेहमीच केली जाते.मात्र या विचारसरणीलाच मागे टाकेल अशी घटना चर्होली ( ता.हवेली) येथे घडली आहे. येथील राहुल रासकर या भाजी विक्री करणाऱ्या तीस वर्षीय युवकाने आपल्या वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करत मध्यमवर्गीय व धार्मिक कुटुंबातही नेत्रदाना सारखा आधुनिक दृष्टिकोण रुजत असल्याचे दाखवून दिले असून त्यांच्या या निर्णयाचे समाजातून कौतुक होत आहे.
   चऱ्होलीतील जुन्या पिढीतील शेतकरी तुकाराम रासकर यांचे वृद्धापकाळाने निधन ( दि.21)रोजी निधन झाले.आपल्या वडिलांचे निधनाचा शोक आवरुन वडिलांचे नेत्रदान करण्याचा निर्णय त्यांचा मुलगा राहुल रासकर यांनी घेतला त्यांच्या या निर्णयाला मृत रासकर यांच्या पत्नी इंदुबाई रासकर,मूली लक्ष्मी फूलसुंदर,संगीता भुजबळ,लक्ष्मी कुदळे,कविता भुजबळ,सुन मनीषा रासकर व नातू खेड नगरपरिषदेचे नगरसेवक संदीप रासकर,संतोष रासकर या सर्वानी या विचाराला पाठिंबा दिला.
  नेत्रदान व अवयव दानाचे  महत्व जाणलेल्या शिक्षक सुनील बेनके यांनी या सामाजिक उपक्रमात  पुढाकार घेत रासकर यांना योग्य मार्गदर्शन केले.नेत्रदान करण्याचा निर्णय घेतल्या नंतर आदित्य बिर्ला नेत्रपिढीचे यूनिट तासाभरात चऱ्होलीत दाखल झाले.तात्काळ मृताचे डोळे ताब्यात घेऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.परिसरात नेत्रदानाचा एक आदर्श उपक्रम या माध्यमातून रासकर कुटुंबीयांनी समाजापुढे ठेवला आहे.राहुल रासकर यांचे शिक्षण अवघे बारावी असून ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात.आपणही नेत्रदान करावे ही इच्छा त्यांच्या मनात कायम घर करुण होती.ती इच्छा वडिलांचे नेत्रदान करुण पूर्ण झाली असली तरी यावरच न थांबता सर्व कुटुंबाचेही मरणोत्तर नेत्रदान करण्याचाही त्यांनी संकल्प केला आहे. सदर उपक्रमास त्यांना जितूभाई शहा ,सामाजिक कार्यकर्ते पंडित खेडकर आणि आदित्य बिर्ला नेत्रपेढी यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी उपस्थित नातेवाईक व ग्रामस्थांनाही या विधायक उपक्रमाचे स्वागत केले व येथून पुढे आमच्या कुटुंबियांच्या वतीने असा उपक्रम चालूच ठेवू अशी भावना राहुल रासकर यांनी व्यक्त केली.तर सध्या देशात नेत्रदानाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे परंतु त्या मानाने नेत्रदान होत नाही आमच्या गावातील राहुल  रासकर यांनी आपल्या वडिलांचे नेत्रदान करून चऱ्होली नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श निर्माण केला  आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो.असे मत  सावतामाळी सोसायटीचे संचालक प्रवीण काळजे यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा