गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

पाश्चिमात्यांचे अनुकरण कशाला ? 
                    
                   खर तर ज्या संस्कृतीचे गोडवे जगभर गायले जातात त्या भारतीय संस्कृतीत आज पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्याची परंपरा कुठून आली हेच कळत नाही.
भारतीय संस्कृतीत अशी काही सन आहेत कि त्यांचे थ्रिल अनुभवल्यास या अश्या वेगवेगळ्या डे न ची गरजच पडणार नाही.परंतु आपल्या संस्कृतीतले लावण्य न शोधता विदेश्या
प्रमाणे त्या वेगवेगळ्या वेशभूषा करून,डे साजरे करून काय हाती येत .उलट आपली संस्कारक्षम संस्कृती जाऊन बेजबाबदार संस्कृती निर्माण  करण्याला खतपाणी घातल्या सारखच नाही का ?
ज्या गोष्टींचे डे साजरे केले जातात .अश्या गोष्टी रोजच्या जीवनात जगण्या सारख्याच आहेत पण तरी हि आपण या डेज ला विशेष महत्व देताना दिसून येतो.
           आचार्य अत्र्यांच्या म्हणण्या नुसार ''ब्रिटीश लोक म्हणत कि देश देऊ पण शेक्सपियरच वाड्मय नाही ''.त्यांना आपल्या संस्कृतीच्या पाउल खुणांच कौतुक आहे.
 पण आम्हास आमच्या महत्वाच्या परंपरेचे महत्वच नाही.वंचित,पूजनीय घटकांना पुजून दिवस साजरा करण्याची परंपरा आपल्या कडे असताना वेगळे डे साजरे करण्याकडे कल का ..? 
                          पाश्चिमात्यांचे अनुकरण नको कारण हि भारतीय संस्कृती आहे.जिथे आयुष्य भर माया करणाऱ्या आईची जागा  डे मधे नसून ती हृद्यात आहे.जिथे वर्षभर राबणारया बैलाचा पोळा घालून आदर व्यक्त केला जातो,जिथे शेतीचे उंदरान पासून राखण करणाऱ्या नागाची पंचमी साजरी केली जाते.जिथे महापुरुषांच्या सन्मानार्थ शिक्षक दिन ,बालदिन साजरे केले जातात .आपण यांना महत्व न देता  पाश्चिमात्यांचे अनुकरण करून विदुषकी वस्त्रे परिधान करून,प्रेम व्यक्त करण्याला खास दिवस देऊन आपल्या सणानला जागतिक महत्व देतो का याचा विचार व्हायला हवा .खर तर आजचा तरूण प्रेम व्यक्त करण्या साठी वेलेनटाईन डे ची वाट पाहतो का..? तरी पण अश्या दिवसांनला साजरे करून आपण कोणती परंपरा जपतो..? आपण या पेक्षा आपली संस्कृती जगापुढे मांडली पाहिजे जेणे करून ते आपले अनुकरण करतील आपण नव्हे.
 
श्रीकांत बोरावके ,दिनांक  ०३ जानेवारी २०१३



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा