गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

मला मायभूमी कुठे आहे ...?

                      सुमारे पाच एक दशकांपूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हे चारच शब्द उच्चारले आणि हजारो वर्षे एका विषम 
समाज परिस्थितीच्या पोटात घुसमटलेली भावना ज्वालामुखीचा स्पोट घडवुन गेली.आज कदाचित विषय वेगळा ,व्यवस्था वेगळी असो 
वा वातावरण वेगळे असो पण हाच प्रश्न कालही तसाच होता,आजही तसाच आहे,आणि कदाचित उद्याही तसाच असेल.
                              आपली राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाटी प्रत्येक गोष्टीला विरोध करणे हा तर पायंडाच पडत चालल्याचे दिसून येते.
 आपल्या विरोधाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय याचे भानही यांना नाही.अशाच कुटील राजकारणाची झळ कमल हासन च्या विश्वरूपम ला बसली .सिनेमाला sensor  ने हिरवा कंदील दाखवला असूनही धार्मिक,राजकीय संघटनांच्या मूर्ख पणाला बळी पडाव लागत हि अतिशय खेदाची बाब आहे.या अश्या विरोधाचा फटका या आधी हि अनेक कलावंताना बसला आहे.कलेतील काही कळो ना कळो पण तरि ही विरोध करून कलाकृती रोखल्या जातात तरीही शासन मात्र मुग गिळून गप्प बसते एखाद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते तेवा हे लोकशाहीचे रक्षक गप्प का बसतात ?
                               हि परस्थिती म्हणजे या समाजच स्वास्थ ढासळत असल्याच घोतक आहे.याला अधिक खत पाणी घालण्याचा जो प्रयत्न सुरु आहे तो हाणून पाडण्याची आज गरज आहे.अन्यथा बाबा साहेबांचे हे बोल स्वातंत्र्या नंतर हि तेवडेच जिवंत रहिल्या शिवाय वेगळे काही वाटत नाही व ज्या देशाचा नागरिक संतुष्ठ नाही तो देश रसातळाला गेल्या शिवाय राहत नाही याचे भान शासनाने ठेवले पाहिजे.कारण ज्या युवा पिढि वर उद्याचा सक्षम भारत उभा आहे त्याच तरुणाईच्या स्वातंत्र्यावर गदा आल्यास हा देश महासत्ताक होणे केवळ स्वप्नच राहील.आणि याच बरोबर चांगल्या कलाकृती घडत नाही याची ओरडही सुरुच राहील.कलेला राजाश्रय असल्या शिवाय ती टिकत नाही हा इतिहास आहे.तो भविष्य काळ न व्हावा हिच अपेक्षा ..
 
प्रभात ,कॉलेज कनेक्ट  दिनांक ०७ फेब्रुवरी २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा