बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

शाळा गुल्ल; खाजगी शिकवण्या हाऊसफुल्ल

शहरात खाजगी क्लासचा वाढतोय व्याप ; सामान्यांना शिक्षण अवाक्या बाहेर


श्रीकांत बोरावके

आपल्या मुलाला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे तो अधिक हुशार आणि गुणवंत व्हावा या करिता आपल्या अतिरिक्त खर्चाला कात्री लावत मुलाला खाजगी क्लासला पाठविणाऱ्या पालकांमध्ये वाढ होत असून पिंपरी-चिंचवड शहरात सद्या  खाजगी क्लासेसचा गोरख धंदा मोठ्या जोमात सुरु आहे.पण अशा पालकांमुळे ज्यांना या आभासी आणि खर्चिक शिक्षण पद्धतीत पडायची इच्छा नसते अशा गरीब कुटुंबातील पालकानाही अशा प्रवाहात वाहावे लागत आहे.काही शाळांमध्ये तर मुल खाजगी क्लासला जातात म्हणून वर्गात सविस्तर शिकविले जात नसल्याच्या तक्रारी कानावर येत आहेत तर काही ठिकाणी शाळेतील शिक्षकांचेच खाजगी क्लासेसे असल्याने वर्गात काही प्रकरणे शिकवली जात नसल्याचे समोर आले आहे.यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी खाजगी क्लासेस लावले नाहीत त्यांच शैक्षणिक नुकसान होत असून या बाबत तक्रार ही करता येत नाही.याही पेक्षा गंभीर प्रकार शहरात सुरु असून कॉलेज करण्यापेक्षा केवळ खाजगी क्लास करणारे विद्यार्थी असून यामुळे शहरात महाविद्यालये गुल्ल आणि खाजगी क्लासेस झाले फुल्ल अशी परस्थिती दिसून येत आहे.
         
खाजगी क्लासेसचा असा धंदा शहरात तेजीत असून त्याची फी महाविद्यालयांच्या शैक्षणिक फी  पेक्षाही अधिक आहे.त्यातच अनेक क्लासवाले गुरुजी करोड पती झाल्याचे बोलले जात आहे.यात खाजगी क्लास पेक्षा पालकांची मानसिकता सुधारण्याची गरज असून आपला मुलगा खाजगी क्लासला गेला म्हणजे अधिक हुशार किवा चांगल्या गुणांनी पास होणार हा समज दूर करण्याची गरज आहे.या क्लासेसमुळेच शाळा-महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेची बोंंब झाल्याचे दिसते. त्यात हे क्लासेसवाले तरी कोण ? त्याच महाविद्यालयातील शिक्षक-प्राध्यापक असतात.दुकानदारी चालत नाही म्हणुन हमाली करण्याचा जणु काही ठेकाच धरला आहे की काय? असा प्रश्न प्रत्येकालाच पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र तरीसुद्धा या शिकवणींमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा म्हणुन प्रत्येकजन प्रयत्न करतांना दिसतात.शिकवणारांचा आवाज विद्याथ्र्यांपर्यंत चांगला पोहचावा म्हणुन प्रत्येक शिकवणीच्या खोलीमध्ये मोठ-मोठ्या आवाजाचे यंत्र बसवण्यात येत आहेत.
खाजगी क्लासेस म्हणजे जणू बिन मान्यतेच्या शाळाच बनत आहेत.
             खाजगी क्लासेसला सरकारी मान्यता नाही त्यात या मध्ये शिकविणारे शिक्षकही दर्जात्मक असतील याची खात्री नाही तरी आपल्या मुलाला अमुक क्लास मध्ये प्रवेश मध्ये प्रवेश मिळावा याकरिता आग्रही असलेल्या पालकांची संख्या ही वाढती आहे.त्या पेक्षा शासनाच्या अनुदानित शाळांमध्ये शासनाचा पगार घेऊन शिकविणारे शिक्षण दर्जात्मक नसतील का ? याचा पालक तुसभर ही विचार करत नाही.थोडक्यात खाजगी क्लासेसची  शिकवणी ही ज्याच्या त्याची अंतर्गत बाजू असली तरी यांमुळे सामाजिक समतोल ढासळला जात असून ही चिंतेची बाब ठरत आहे.यांमुळे ज्यांची परस्थिती आपल्या किमान शिक्षण देण्याची नाही अशा गरीब पालकांनाही इतरांच्या बरोबरीने आपल्या मुलांनी चालावे या करिता खाजगी क्लासचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या क्लासेसचा त्रास केवळ दहावी - बारावीतील विद्यार्थ्यानांच सहन करावा लागत नसून पहिली ते पदवी पर्यंतच्या साऱ्यांच्याच पाठीवर हा बागुलबुवा आहे.यामुळे शाळा ही विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीवर म्हणावे तसे लक्ष देत नसून ते ही हे काम खाजगीवाल्यांकडे सोपवून वर्षभर निर्धास्त असतात.यामुळे च शहरात सद्या तेरी भी चूप मेरी चूप असे प्रकार आहेत. महापालिकेच्या १३६ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा असून २०८ खाजगी शाळांचा समावेश आहे.याबरोबरच पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये व अभियांत्रिकी विद्यालये मोठ्या संख्येने शहरात आहेत.या नोदणी कृत आणि अधिकृत असल्याने यांचा निश्चित असा आकडा सांगता येतो.यालट खाजगी क्लासेसची  अधिकृत नोंद नसून त्यांचा अंदाजे आकडा हजारोंच्या घरात आहे.

शासन कायदा करण्याच्या तयारीत …
याबाबत काही प्रमाणात निर्बध यावेत या करिता शासन पातळीवर कायदा करणार असल्याची घोषणा नुकतीच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पावसाळी अधिवेशनात विधीमंडळात केली.आहे तरीही यातूनही पळवाट काढत हा गोरख धंदा सुरूच राहिली असे मत एका जेष्ठ शिक्षकाने व्यक्त केले.


आम्ही स्वत: घरापर्यंत जात नाही…

आम्ही आमचे खाजगी क्लास काढले असले तरी त्या करिता आम्ही आमच्या कडेच प्रवेश घ्या यासाठी आग्रही नसतो किवा त्या करिता घरा पर्यंत ही जात नाही पालक स्वत:च आमच्या पर्यंत येत असतात.खाजगी क्लास लावावा कि न लावावा हा ज्याचा त्याचा अंतर्गत प्रश्न आला.असे मत एका खाजगी क्लास चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले

चिंतेची बाब
खाजगी क्लासेसमुळे विद्यार्थी आणि शाळांचा शैक्षणिक दर्जा ढासळत असून ही चिंतेची बाब आहे.ज्यांनी परस्थिती चांगली ते क्लास लावू शकतात परंतु ज्यांना दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न आहे.त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेची जबाबदारी कोणाची.यामुळे खाजगी क्लासेस बंद झाल्यावर सहाजिकच शाळांच्या गुणवत्तेच्या जाबादाऱ्या  वाढतील आणि सारे एका समान प्रवाहात येतील.
          :-  सौदामिनी कांबळे,समाजिक कार्यकर्त्या

( पूर्व प्रसिद्धी पुढारी ०२-०८-२०१५ )


 

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०१५

तरुणाईला व्हाइटनरची झिंग

शाळकरी मुलांमध्ये प्रमाण अधिक ; पालक अज्ञभिज्ञ 

श्रीकांत बोरावके : मोशी

      
     
                 कागदावरील एखादी चूक झाकण्यासाठी वापरले जाणारे व्हाइटनरच आज चुका करण्याचे साधन बनत असून किरकोळ वाटणारे व्हाइटनर आज नशा करण्याचे साधन बनत आहे.या नव्या अमली पदार्थ ठरू पाहणाऱ्या व्हाइटनरने नशा करू पाहणाऱ्या  मुलांचे प्रमाण गेल्या चार पाच वर्षांपासून वाढत आहे. तेरा वर्षांपर्यंतची मुले या सेवनाला जास्त बळी पडत असल्याचे समोर आले असून याबाबत मुलाबरोबरच पालकही अज्ञभिज्ञअसल्याचे दिसून येते.केवळ काहीतरी वेगळे जाणवते म्हणून दररोज व्हाइटनरचा वास घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आपण कुठल्याश्या व्यसनाच्या आहारी जात आहोत हे जाणवत नाही तर आपला मुलगा असले काही करत असले याची पालकांना ही जाणीव नाही.
रस्त्यावरील,झोपडपट्टीतील,रेल्वेस्टेशन वरील मुलांपूर्ती व्हाइटनरची नशा सीमित राहिली नसून पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यमवर्गीयांपासून ते उच्चभ्रू कुटुंबातील मुलांमध्येही हा प्रकार सुरु आहे.शाळेत वा शाळेबाहेर ,स्कूलबस मध्ये पालक नसताना घरात किंवा सोसायटी,वस्ती मध्ये आज चोरी छुपे मुले व्हाइटनरची नशा करताना दिसून येतात.मध्यंतरी व्हाइटनरच्या विक्री वर प्रशासनाने काही प्रमाणात निर्बंध घातले होते.यामध्ये प्रामुख्याने विक्री करताना ग्राहकाची मागणी,ग्राहकाचे वय,एकाच ग्राहकाची वारंवार त्याच गोष्टीची मागणी होऊ लागल्यास त्या ग्राहकास विक्री न करने अशा निर्बंधांचा समावेश होता.परंतु केवळ व्यवसाय वृद्धीसाठी अशा निर्बंधांचा विचार न करता सरासपणे मागणी तसा व्हाइटनरचा पूरवठा होताना दिसून येतो.यामुळेच या व्यसनाला पायबंद घालणे अशक्य होताना दिसून येते.कमी किंमतीत आणि सहज उपलब्ध होत असल्याने काही इतर साधनातून व्यसन करणारी मंडळी ही व्हाइटनरच्या व्यसनाकडे वळतात.प्रामुख्याने व्हाइट स्टेशनरीच्या दुकानात मिळत असल्याने आणि स्टेशनरीची दुकाने शाळा,महाविद्यालय परिसरात असल्याने या मंडळीची अशा ठिकाणी वर्दळ असते त्यात अशा लोकांच्या संपर्कात एकदा शाळकरी मुलगा आल्यास त्यालाही यात गुंतण्यात वेळ लागत नाही आणि अशा प्रकारे एका कडून दुसऱ्याला दुसऱ्या कडून तिसऱ्याला व्यसनाची माहिती प्रसारित होते.आणि यातूनच व्यसन वाढते.शहरातील भोसरी,पिंपरी,मोशी,आळंदी रस्ता,दिघी,चिखली,कुदळवाडी,आकुर्डी,निगडी,मोहन नगर,इंद्रायणी नगर,चिंचवड आदी भागातील शाळा,महाविद्यालय परिसरात हे प्रकार घडत आहेत.


असे होते व्हाइटनरची नशा….

व्हाइटनर रुमालावर टाकून हुंगल्याने त्याची नशा चढते. व्हाइटनरमध्ये अॅसिटोन असल्याने त्याचा परिणाम थेट मेंदूवर होतो. यामुळे कमालीची नशा चढते आणि बधिरताही येते. अॅसिटोन हळूहळू स्नायूंवर परिणाम करून, ते दुबळे करतात. मानसिकदृष्ट्या मुले खच्ची होऊ लागतात आणि काही वेळेस मुलांमध्ये आक्रमकताही तेजीने वाढते, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात..


               आपला मुलगा व्हाइटनरच्या सेवनाला बळी पडतो आहे हे पालकांच्या सहज लक्षात येत नाही. रस्त्यावर, रेल्वेस्टेशनवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांचे प्रमाण या सेवनामध्ये जास्त दिसून येते. व्हाइटनर कमी किमतीत आणि सगळीकडे सहज उपलब्ध असल्याने मुले त्याचा वापर करू शकतात. या अमली पदार्थासंदर्भात पालकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये फारशी माहितीही नाही. त्यामुळे मुलाने त्याची मागणी केली अथवा दुकानातून जाऊन आणले तर, शालेय कामासाठी त्याचा वापर करत असेल या विचाराने पालकांचे या वृत्तीकडे दुर्लक्ष होते.
                                                     
( पूर्व प्रसिद्धी,पुढारी २० जुलै २०१५ )


                       

शुक्रवार, १७ जुलै, २०१५

शहरात रोडरोमियोंचा उच्छाद वाढतोय

  वेळीच प्रतिबंध करण्याची गरज ; तरून दिशाहीन होतायेत
श्रीकांत बोरावके
                   द्योगनगरीत सद्या गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमियोंचा उच्छाद वाढत असून यांमुळे शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थिनीना,महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या रोडरोमीयोंची मजल मुलींचा विनयभंग करण्या पर्यंत जात असून केवळ भीती मुळे काही पालक त्यांची तक्रार करण्यास धजावत नाही.तर यांमुळे आपली शाळा,शिक्षण,नोकरी बंद होईल या भितीने मुलीही हा प्रकार पालकांना न सांगता निमूटपणे  सहन करत असल्याने या रोडरोमियोंना चांगलेच रान मोकळे झाले आहे.एका दुचाकीवर ट्रिपल शीट बसून जोरजोरात कर्कश आवाज करत हॉर्न वाजवणे यांमुळे मुलींचे लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणे,मुलींना भरधाव वाहन चालवत कट मारून निघून जाने,अचकट विचकट आवाज काढणे,मुलींना पाहून अश्लील हावभाव करणे असले प्रकार सद्या सुरु आहेत.पिंपरी चिंचवड शहरातील विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालयांत शिक्षण घेण्यासाठी नजीकच्या ग्रामीण भागातील व उपनगरातील मुलींचीही मोठी संख्या आहे.यावेळी ग्रामीण भागातील मुलींना बसने प्रवास करावा लागतो.बसस्थानकात वा स्थानकाकडे चालण्याच्या रस्त्यावर येताच रोड रोमियो मोठ्या संख्येने आपली हीरोगिरी दाखवत असतात.वर्गामध्ये ही काही मुले असे प्रकार करत असून त्यांना बाहेरील मुलांचाही पाठींबा मिळत असतो. त्याचबरोबर बसस्थानकापासून महाविद्यालयांपर्यंतचे बरेच अंतर असल्यामुळे या विद्यार्थिनी रस्त्यावरून पायी चालत असतांना रोडरोमियो मोटारसायकल  वरून मागून येतात व मोठ्या आवाजात गाडीचा हॉर्न वाजविने, रस्त्यावरून  वेगात असलेल्या मोटारसायकलवरून मुलींना कट मारून जाने, आदी प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत असल्याने या ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी ही रोमियोगिरीची घुसमट नाईलाजाने सहन करावी लागत आहे.
                 रोमियो गिरी करणारे तरुणही अगदी सोळा ते एकोणीस वयो गटातील असून हिरोगिरी करण्याच्या नादात आपण काहीतरी गुन्हा करतोय याची जाणीव त्यांनाही नसल्याचे दिसून येते.अशाप्रकारच्या कृत्यांवर वेळीच प्रतिबंद घातला जात नसल्याने त्यांचे धाडस वाढत असून प्रसंगी विनयभंगा सारखे गंभीर गुन्हे ही घडतांना दिसून येत आहे.अशाप्रकार थांबविण्यासाठी पोलिसांबरोबरच महाविद्यालय आणि शिक्षकांची ही जबाबदारी असून पालकांनी ही आपल्या मुलांच्या वागणुकी कडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.दरम्यान शहरातील भोसरी,पिंपरी,मोशी,आळंदी रस्ता,दिघी,चिखली,कुदळवाडी,आकुर्डी,निगडी,मोहन नगर,इंद्रायणी नगर,चिंचवड आदी भागातील शाळा,महाविद्यालय परिसरात हे प्रकार घडत असून यावर पोलिस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.केवळ तक्रार येण्याची वाट पाहण्यापेक्षा पोलिसांनी स्वत:च लक्ष पुरवायला हवे असाही सुरु पालक वर्गातून उमटत आहे. 

मुली म्हणतात नाव नाही छापणार न…. मग सांगते …!


 १) बाबा माझे शिक्षणच थांबवतील
आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ असे चार भावंड असून आमची घरची परस्थिती ही बेताची असूनही माझे बाबा आम्हांला उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवतात काही मुलांचा त्रास हा नियमित सहन करावा लागतो.या बाबत तक्रार ही करता येत नाही.तक्रार केल्यास घरी समजेल आणि नाहक त्रास नको म्हणून बाबा माझे शिक्षणच थांबवतील अशी भीती वाटते.असे भोसरी भागातील शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
२) ''व्हाईट कॉलर'' रोमियोगिरी कशी थांबवणार

    चांगल्या वेशात सुशिक्षित पेहरावात राहून रोमियोगिरी करणारे ही भरपूर आहेत.केवळ सभ्य दिसण्यामुळे त्यांच्या कडे बोट करता येत नाही.अशांवर संशय ही घेता येत नाही तर कारवाही दूरच राहिली.बस,लोकल यांमध्ये हे रोमियो चाळे करत असतात.अगदी निर्दोकपणे
३) सिटवर आहे व्हाटस अप नंबर
बस मधून मोठ्या आवाजात 'तुजा व्हाटस अप नंबर दे फक्त ' असे बोलणारी बरीच मुल आहेत त्यांचा ग्रुपच असतो दररोज प्रवासात.त्यात  काही आमच्याच वर्गातील असतात .उतरताना पुन्हा मोठ्याने ओरडतात माझा नंबर आहे बग सीटवर … सेव कर नक्की.आणि पुन्हा नावाचा जयघोष सुरु.

4) तसला काही प्रकार कानावर येता कामा नये.
आई म्हणते आपल थेट कॉलेजला जायचं आणि घरी यायचं कोणी काही बोलल तरी लक्ष द्यायचं नाही.त्यांच्या नादी लागायचं नाही.तसल काही झालेल आमच्या कानी आले तर तुज शिक्षणच बंद.


समुपदेशन करण्याची गरज
केवळ कारवाईचा फास न आवळता असे कृत्य करणाऱ्या मुलांचे समुपदेशन करायला हवे.त्यांच्या कडून ही नकळत केवळ अज्ञानातून असे प्रकार घडत आहेत.हिरोगिरी करण्याच्या नादात आपण काही तरी गुन्हा करतोय याची त्यांनाही जाणीव नसतेच.अर्थात याची सुरुवात समाजापेक्षा घरातून होणे गरजेचे आहे.आपला मुलगा काय करतो याकडे पालकांनी दुर्लक्ष करणे योग्य नव्हे.अशी प्रतिक्रिया सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षिका राधामाई कुलकर्णी यांनी व्यक्त केली.  
( पूर्व प्रसिद्धी -पुढारी -पिंपरी - ०४ जुलै २०१५ )

 

उद्योगनगरीत स्थानिकांची वणवण


पात्रता असूनही बेरोजगार राहण्याची वेळ ; आश्वासने फोल

 श्रीकांत बोरावके
                  आपली शेतजमीन उद्योगनगरीच्या विकासाला देऊन अल्पभूधारक झालेल्या स्थानिक शेतकऱ्यानच्या मुलांवरच आज बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे.स्थानिक म्हणून सर्व पात्रता पूर्ण करूनही नोकरी पासून डावलल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.नोकरी देणे हा ज्या त्या कंपनीच्या व्यवस्थापनाचा अधिकार असल्याने डावलले घेल्यास तक्रार ही दाखल करता येत नसल्याने यावर राजकीय वरदहस्ताशिवाय दुसरा उपाय ही सापडत नाही.ज्या तरुणांना असा वरदहस्त लाभत नाही त्यांना मात्र बेरोजगारीच्या दलदलीतून बाहेर पडणे अशक्य होत आहे.
               उद्योगनगरीतील अशा बेरोजगारांची संख्या हजारोंच्या वर असून दरवर्षी त्यात भरच पडत आहेत.स्थानिकांना नोकऱ्या मध्ये सामावून घेण्या करिता त्यांना आवश्यक ते कौशल्य आत्मसात करण्या करिता शासनाने परिसरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारल्या आहेत.येथील स्थानिक मुले ही येथून प्रशिक्षण पूर्ण करत असतात तदनंतर त्यांना सहा महिन्यांच्या अनुभव प्रशिक्षणास सरकारी,निमसरकारी वा काही बड्या कंपन्यांमध्ये रुजू करण्यात येते मात्र हा सहा महिन्यांचा प्रशिक्षण काळ संपल्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थाने कायम स्वरूपी रोजगार मिळविण्याचा शोध सुरु होतो.तेव्हा त्यांना स्थानिक म्हणून नोकरी नाही या वास्तवाला सामोरे जावे लागते.त्यांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची आज पर्यंत अनेक पक्ष व नेत्यांनी आपआपल्या कार्यक्रमात आश्वासने दिली.पण प्रत्येक तरुणाला आज ही आश्वासने फोल ठरल्याचे वाटत आहे. आहे.यामुळे असे बेरोजगार तरुण व्यसनांच्या आहारी जात असून हे व्यसन करण्यासाठी लागणारे पैसे मिळविण्यासाठी ते झटपट पैसे मिळवून देणारे उद्योग शोधू लागतात.यातूनच गुन्हेगारी ही वाढताना दिसून येते.यासर्व गोष्टींचा परिणाम त्याला एकट्यालाच सहन करावे लागत नसून त्याच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही सहन करावे लागत आहेत.
           याबाबत कंपन्यांचे म्हणणे ही विचारात घ्यायला हवे त्यांच्या म्हणण्या नुसार स्थानिक तरुण कंपनीत दंडेलशाही करतात.प्रसंगी वरिष्ठांना मारहाण ही करतात यामुळे स्थानिक तरुणांना कंपनीची दारे बंद केली जात असल्याचे समोर येत आहे.परंतु काही मुठभर व्यक्तींच्या दंडेलशाही प्रवृत्तीत सर्वच स्थानिक तरुणांचे मोजमाफ करणे कितपत योग्य एका मुळे सर्वांवरच अन्याय का ? असा प्रश्न काही होतकरू स्थानिक तरुण उपस्थित करत आहेत.या जटील प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा भविष्यात हा विषय पेटल्या शिवाय राहणार नाही असा सूर ही स्थानिक समाजिक कार्य करणाऱ्या संस्थामधून निघत आहे.
दंडेलशाहीवरचा उपाय

या प्रश्नाबाबत एका खाजगी बड्या कंपनीच्या अधिकाऱ्यास विचारले असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि स्थानिक मुले बदलून दिलेल्या शीप मध्ये काम करू इच्छित नसतात.त्यात बाहेरील राज्यातील,जिल्ह्यातील मुले सुपरवाईजर,वरिष्ठ अधिकारी म्हणून नेमल्यास त्यांचा हुकुम ऐकणे त्यांच्या हाताखाली काम करणे याचा येथील मुलांना न्यूनगंड वाटतो.त्यात कामावरून तणाव,वाद निर्माण झाल्यास थेट स्थानिक म्हणून दंडेलशाही दाखवून वरिष्ठांना मारहाण ही करतात.यावर उपाय म्हणूनच स्थानिकांना न घेण्याचा पायंडाच कंपनीत पाडला जातो.

एका मुळे सर्वांनाच त्रास का ?
दंडेलशाही करणारा कोणी एक असतो परंतु त्याच्या वरील कारवाई मध्ये इतर स्थानिक तरुणही भरडले जातात.यामुळे सर्वांनाच नोकरीची दारे बंद करणे कितपत योग्य ? यावर एक सकारात्मक उपाय हवाच अन्यथा बेरोजगारीचा वाढता लोंढा कोणता सुसंस्कृत समाज निर्माण करेल याचा एक जागृत तरुण म्हणून आम्हांला ही प्रश्न पडतो.
                                       :- सचिन पाटोळे,एका खाजगी सामाजिक संस्थेचे संचालक.
या भागात आहेत अघोषित निर्बंध

उद्योगनगरीतील भोसरी एमआयडीसी,तळवडे,निगडी,पिंपरी चिंचवड,हिंजवडी परिसर या परिसरात व उद्योगनगरी नजीक चाकण,महाळुंगे,निघोजे,आळंदी फाटा आदी ठिकाणी असलेल्या बड्या कंपन्यांमधून स्थानिकांना पात्रता असूनही डावलले जाते.  

 ( पूर्व प्रसिद्धी पुढारी - पिंपरी - ०२ जुलै २०१५ )



सोमवार, ६ जुलै, २०१५

आनंद मिळविता आला पाहिजे…!

                      
  काल-परवा गावाकडे सहज जाणे झाले.गावातील भैरवनाथ मंदिराचा कळस पावसाच्या सरी झेलत होता.महानगरांपासून जवळ असूनही गावाने आपले गावपण शाबूत ठेवले होते.रविवारचा तो दिवस होता मी पुण्यावरून पावसात चिंब भिजत प्रवास करून घरी आलो होतो.सायंकाळचे सहा वाजले होते.बाहेर पडणारा मुसळदार पाऊस पाहत मी दारात उभा होतो.तेवड्यात ''कव्हा आलासा …जी असे म्हणत सखूमावशी माझ्या पुढे उभी राहिली.सखू मावशी शिक्षणाचा मागमूस नसलेली,देशाच्या पस्तीस रुपयात जेवण मिळवणाऱ्या लोकांच्या यादीतही न बसू शकणारी,आपला पती हेच आपलं दैवत आणि आपल्या मुलांचे योग्य संगोपन हेच जीवनकार्य मानणारी पुरोगामी महाराष्ट्रातील हि महिला होती.ती माझी कोणीही नव्हती तरीही माणुसकीच्या बंधनात ती आमची कोणातरी असल्याची जाणीव आम्हाला होती.
''दुपारीच आलो मावशी ; कशा आहात तुम्ही…. ? ''  मी विचारल.  ''बरी आहे जी आमच्या ठकूचा बडडे आहेजी ताईसाहेबांना बोलवायला आले होते.तुम्ही पण भेटलात बर झाल.ताईनां पण सांगा आणि तुम्ही पण या चला अजून निरोप द्यायचाय येते जी….''   सखू . बडडे म्हणजे बर्थ डे अस म्हणायचं होत तिला पण बर्थ डे म्हंटल्यावर कशाशी खातात जी असा वर प्रश्न तिने मला केला असता.म्हणून मी पुढे तिला काही हि न बोलता फक्त मान डोलावून होकार दिला.
                       संद्याकाळी ताई सोबत मी त्यांच्या घरी निघालो घर कसले झोपडीच ती काड्या-कुडांच्या झापाणे उभारलेला निवरा. दहा बाय दहाच्या त्या घर वजा झोपडीत मी शिरलो आणि काय आश्चर्य एका  पणतीच्या रम्य प्रकाशात लख लखनारी ती झोपडी एका वेगळ्याच दृशाची जाणीव करून देत होती.आसपासच्या लहान थोर व्यक्तींच्या सावल्या जमू लागल्या होत्या.सखू मावशीच्या नवऱ्याने कोंबड्या झाकायचा झाफ उलटा करून त्या वर फाटक धोतर टाकल होत आणि त्यावर रव्याचा गोलाकार केलेला केक ठेवला होता.दुसरी पणती त्या समोर ठेवली होती.एक एक करून सुवासिनी बोचक्या वर बसवलेल्या ठकूला ओवाळत होत्या.सखू आणि तिचा नवरा गंगाधर आलेल्या प्रत्येकाची विचारपूस आदर करीत होता.त्यांना आज गगन ठेंगणे वाटत होते.आपल्या पोरीचा बड डे म्हणजे काय कि ते असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून पाहताना मला हि एक वेगळ्या जगात आल्याचा भास होत होता.रव्यापासून बनवलेला केक पणती फुकून ठकुने कापला आणि ''हप्पी बड डे ठकू हप्पी बड डे तू यु'' असा नवीनच शुभेच्छा संदेश माझ्या कानावर पडला.रव्याचा तो घास खातांना सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद  कदाचित बेकरीतून आणलेला केक खाताना मला कधीच झाला नव्हता. सगळ्यांना रवा केक देत त्यांचा निरोप घेतांना दिसणारी सखू आणि गंगाधर मला मोठ्या पार्ट्यांमध्ये बुफे साठी आग्रह करणाऱ्या पती पत्नीन मध्ये कधीच दिसली नाहीत.वर वरचा पावूनचार करणारी,आपल्या संपत्तीच प्रदर्शन करणारीच माणंस मला दिसली होती.आज जे पाहत होतो.जे अनुभवत होतो. ते कल्पना शक्तीच्या पलीकडचे होते.आनंद मिळवता येतो फक्त त्या साठी पैसा लागत नसून सुंदर मन लागते हेच सखूच कुटुंब मला शिकवून गेल होत.खरच आनंद पैसा,संपत्ती यात नसून तो आपण कसा मिळवतो यातच आहे.फक्त त्या साठी आपल मन जाग्यावर असायला हव हे सखू कडे पाहून वाटत होत.पैसे नाहीत म्हणून मुलांना कुठेच न नेणारी माणंस,जेवणाचा,कार्यालयाचा,कपड्यांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलांचा वाढदिवस न  करणारी माणंस पहिली कि अस वाटत कि जे नाही त्याची चिंता करण्यापेक्षा जे आहे.  त्यात आनंद मिळवून सुखी राहण यांना का नाही जमत.आहे त्यात सुख मिळवन अधिक सोप्प असत फक्त ते मिळवता आल पाहिजे.हा विचार करत मी घरी आलो तर टेलिव्हिजनवर नवीन आयफोन लॉंच झाल्याची जाहिरात सुरु होती.…
( पूर्व प्रसिद्धी दैनिक प्रभात ,२० जुलै २०१४ )

शनिवार, २० जून, २०१५

शहरातून '' पाणपोई '' संस्कृतीच होतीये हद्दपार

भरउन्हात पाण्यासाठी पादचाऱ्यांची वणवण ; स्वयंसेवी संस्थाही संवेदनाहीन

श्रीकांत बोरावके
 
                    कडाक्याचा उन्हाळा,डोक्यावर रणरणत ऊन असतांना भर दुपारी शहरातील रस्त्यावर फिरलात तर घोटभर पाणी हि विकत घेण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते कारण शहरातून पाणपोईच गायब झाली आहे.पूर्वी प्रमाणे स्वयंसेवी संस्थाही पाणपोई उभारतांना दिसत नाही.
                         उन्हाळा आला म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आजकाल साद घालताना दिसत आहेत. सरकारी यंत्रणाही यासाठी सरसावल्या आहेत. परंतु, माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी असणारी आवश्यक सोय मात्र कमी झालेली दिसते आहे.
                          पाणी पाजणे हे पुण्याचे कार्य म्हणून अनेक व्यक्ती व  स्वयंसेवी संस्था पूर्वी अशा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सोय करायच्या. परंतु, आजकाल या संस्था याबाबतीत उदासिन दिसून येत आहेत.त्यांच्या या उदासीनतेचा लाभ मिनरल वॉटर विकनारयांना होत असून आता रस्तोरस्ती त्यांनी दुकाने थाटलेली दिसत आहे.यासाठी तहानलेल्या जीवांना आता घशाची कोरड भागविण्यास पंधरा ते वीस रुपये मोजावे लागत आहे.उद्योग नगरीत काम करणाऱ्या कष्टकरयाला तहान भागविण्यासाठी विकतचे पाणी घेणे कितपत परवडणारे आहे.?हा प्रश्न उपस्थित होतो.शहरात फेरफटका मारला की, फार तुरळक प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या सोई दिसून येतात.
                           ''पाणी हेच जीवन'' ,''पाण्याचे काम पुण्याचे काम'' असे जरी म्हटले जात असले तरी आज पिण्याच्या पाण्याच्या कृत्रिम टंचाईने उद्योग नगरीतील सामान्य,कष्टकरी नागरिक हवालदिल होत आहेत. पिण्याचा पाण्यासाठी नागरिकांची भटंकती होऊ नये म्हणून शहरातील रस्त्यावर पाणपोई लावल्याचे चित्र आधी मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते. मात्र, आता याची संख्या कमी झाली आहे का ? कि वाटसरूस पाणी पाजण्याची आपली संस्कृतीच नामशेष होत आहे ? असा प्रश्न  निर्माण झाला आहे. स्वयंसेवी संस्था,तरुण मंडळे तसेच पालिकेने यासाठी पुढाकार घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशीही मागणी होताना दिसून येत आहे.



पक्षांना पाणी ; माणसाचे काय  
आज रस्त्यावर फिरत असतांना एकाही ठिकाणी पाणपोई दिसत नाही.आजची तरुण पिढी पक्षांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पुढाकार घेताना दिसते.परंतु भर उन्हात रस्त्याने चालेल्या वाटसरूबाबत त्यांच्या संवेदना का जाग्या होत नाही.
:-  तुकाराम कांबळे,जेष्ठ नागरिक





 ( पूर्व प्रसिद्धी पुढारी - पिंपरी ०८मे २०१५ )

बुधवार, १७ जून, २०१५

भाडेकरुंची माहिती देण्याकडे दुर्लक्ष


जागृकतेचा अभाव : निम्यापेक्षा अधिक लोकांच्या नोंदीच नाही.

श्रीकांत बोरावके
          पिंपरी - चिंचवड  शहरात बाहेरगावावरुन नोकरी तसेच शिक्षणासाठी अनेक जण राहण्यासाठी येत असतात. त्यामुळे घर भाड्याने देण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात शहरात व उपनगरात आहे. घरमालकाने घर भाड्याने देताना भाडेकरूची नोंद पोलिस स्टेशनला द्यावी असे आदेश मध्यंतरी पोलीस अधिक्षकांनी दिले होते.त्यांनंतर भाडेकरुची माहीती न देणा-या काही घरमालकावर गुन्हेही दाखल करण्यात आले.मात्र माहीती देणे बंधनकारक असतानाही घरमालकांचे या नोंदणीकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे शहर व मोशी,डूडूळगाव या उपनगरांमध्ये रहायला येणा-या नागरीकांची संख्याही वाढत आहे.अनेक जण परराज्यातुन शहरात व्यापार व व्यावसायसाठी येत आहेत. शहरात आल्यानंतर भाड्याने घर घेऊन राहणा-यांचे प्रमाण यामुळेच वाढलेले आहे. त्यामुळे अनेक जण घर भाड्याने घेवुन रहात आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी व सुरक्षेच्या दृष्टिने मध्यंतरी पोलीस अधिक्षकांनी घर भाड्याने दिलेल्या व्यक्तीची संपुर्ण माहीती शहर पोलीस ठाण्याला दयावी असे आदेश काढले होते. त्यामुळे घर भाड्याने दिलेल्या प्रत्येक घरमालकाला आपल्या भाडेकरुची माहीती देणे बंधनकारक झाले आहे.या बाबत नोंद करणे अतिशय सुलभ व्हावे या साठी संकेतस्थळाचा पर्यायही पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिला असला तरीही त्या बाबत स्थानिकांमध्ये निरक्षरता असल्याचे दिसून येते.परिणामी तो हि पर्याय निरर्थक ठरत असून भाडेकरुंच्या नोंदीच या परिसरात अपेक्षेप्रमाणे होताना दिसून येत नाहीत.मोशीत स्थानिक नागरिकांच्या हजारो खोल्या भाड्याने देण्यात आल्या आहेत. बोऱ्हाडे वाडी,बनकरवस्ती,शिवाजीवाडी,आल्हाट वस्ती,सस्तेवाडी,लक्ष्मी नगर, संजय गांधी नगर,देहू रस्ता आणि मोशी गावठाण या भागात मोठ्या प्रमाणावर भाडेतत्वावर खोल्या देण्यात आल्या आहेत. सतत बदलणाऱ्या भाडेकरुंमुळे घरमालकांमध्ये त्यांची माहिती घेण्याबाबत निष्काळजीपणा असल्याचे दिसून येते. पुणे,पिंपरी शहरात हि मोहीम प्रभावी पणे राबवली जात असताना मोशी,डूडूळगावकरांमध्ये मात्र याबाबत निरुत्साह दिसून येत आहे.याबाबत पोलिस चौकीशी संपर्क साधला असता संकेत स्थळाचा पर्याय उपलब्ध करण्यात आल्याने नोंदींचा निश्चित आकडा स्थानिक पोलिस स्टेशन कडे  उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती मदत पोलिस चौकीकडून केली जाईल असे आवाहन हि त्यांनी केले आहे.
अपेक्षे प्रमाणे नोंदी नाही…

पोलिस प्रशासनाकडून संकेत स्थळाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी याबाबत मोशी व परिसरातील नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसून.एकंदरीत लोकसंख्येच्या मानाने झालेल्या नोंदी या कमी प्रमाणात असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर पुढारीला दिली आहे.


( पूर्व प्रसिद्धी  लोकमत -ग्रामीण  २२-०४-२०१५ )

मंगळवार, १६ जून, २०१५

''रुपी'' प्रकरणात मोशीकरांच्या लाखोरुपयांच्या ठेवी गुंतून


भविष्याच्या दृष्टीने गुंतवलेले पैसेच भेटेना : व्याजाने पैसे घेऊन गुजरान 

श्रीकांत बोरावके : मोशी

                   आपल्या जमिनींची विक्री करून त्याच पैश्यांवर भविष्यात उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या डोळ्यात रुपी बँकेमुळे आज केवळ अश्रूच उरली आहेत.पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत समावेश झाल्या नंतर मोशीत हळूहळू स्थीत्यांतरे होत गेली येथील जमिनीला सोन्याचा भाव येऊ लागला.काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी नवी स्वप्ने पाहिली या उद्योगनगरी मध्ये सामावण्याची त्या साठी हक्काची जमीन विकून भविष्याच्या दृष्ठीने हा पैसा वापरता यावा यासाठी काही वर्षांसाठी तो ठेव म्हणून रुपी बँकेत ठेवण्यात आला.परंतु संचालकांच्या गैरव्यवहाराने रिझर्व्ह बँकेने 22 फेब्रुवारी 2013 पासून रुपी बँकेवर निर्बंध लादल्याने अनेक खातेदारांची आयुष्यभराची पुंजी या बँकेत अडकून पडली.त्या ठेवी काढताही येत नसल्याने मुलांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी व स्वत:च्या आजारपणासाठी देखील आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने व्याजाने पैसे घेऊन आपली कामे उरकण्याची वेळ या खातेदारांवर आली आहे.
                   कुठलीही चूक नसताना स्वत:च्या हक्काचे पैसे दिले जात नसल्याने त्रस्त झालेल्या रुपी बँकेच्या खातेदारांना आता दाद मागायची कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या दीड वर्षांपासून यावर राज्य शासन तोडगा काढत असून त्यावर कसलाच ठोस उपाय होताना दिसून येत नसल्याने अजून हा वनवास किती दिवस यावरच आत्मचिंतन करण्याची वेळ खातेदारांवर आली आहे.मोशी येथील बोऱ्हाडे वाडी,शिवाजी वाडी,सस्ते वाडी,लक्ष्मीनगर आदी ठिकाणच्या खातेदारांची रुपी बँकेच्या भोसरी शाखेत खाती आहेत.त्यात त्यांनी पाच लाखांपासून पन्नास लाखांपर्यंत ठेवी ठेवल्या आहेत.
                  रिझर्व बँकेने रुपीला सहा महिन्यांतून एकदा खातेदाराला एक हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्याचे आदेश दिले.असले तरी ते तटपुंजे आहे.व्याजाने घेतलेल्या पैश्याचे व्याज देखील त्याने फेडता आले नाही.आता तर बॅंकेवरील निर्बंध वाढविल्याने काहीच रक्कम निघत नाही. 
                 एकंदरीतच सर्वच व्यवहार बँकिंग करण्याकडे सरकारची वाटचाल सुरु असताना अश्या प्रकारे डबगायीला आलेल्या बँकांच्या बाबतीत अपेक्षित कार्यवाही सरकार का करत नाही.केवळ आश्वासनांची खैरात करून खातेदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे प्रयत्न सुरु असून खातेदारांच्या भावनांची गांभीर्याने दखल घेताना कोणीच दिसत नाही.राष्ट्रीय बँकेत रुपीचे विलनीकरण करून लवकरात लवकर यावर या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी खातेदार करत आहेत. 


स्वप्ने धुळीस मिळाली…
मुलीच्या लग्नासाठी पाच वर्ष मुदतीवर मी रुपीच्या भोसरी शाखेत सात लाख रुपये गुंतविले होते.परंतु गेल्या दीड वर्षांपासून बँकेचे व्यवहार ठप्प झाल्याने.मोठ्या जोमात मुलीच लग्न करण्याच स्वप्न धुळीस मिळाल एनवेळी व्याजाने पैसे घेऊन मुलीचे लग्न करावे लागल्याचे मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात राहणाऱ्या महिलेने नाव न छापण्याच्या विनंतीवर सांगितले.


(पूर्व प्रसिद्धी पुढारी - पिंपरी - २९ मार्च २०१५ )

मोशी उपबाजार समितीतील 'व्यवहार ' बंद


कोट्यावधी रुपये पाण्यात ; आडते हवालदिल
श्रीकांत बोरावके   
           मोशी येथील प्रादेशिक कृषी उत्त्पन्न उपबाजार समितीतील बाजार पूर्णपणे बंद झाला असून कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेली इमारत धूळ खात पडून आहे.संपूर्ण माल एकाच ठिकाणी मिळत नसल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे सांगण्यात येते.मोशी उपबाजारापासून पिंपरी व खडकीतील बाजार जवळच असल्यामुळे शेतकरी व्यापारी वर्गाला पर्यायी बाजार उपलब्ध होत आहे.बाजार समितीने गाळे खरेदी वेळेस खडकी व  पिंपरीतील ठोक विक्री बंद करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले होते.परंतु अद्यापही तेथील कामकाज सुरु आहे.परिणामी मोशी बाजारामध्ये माल भरूनही गिऱ्हाईक येत नसल्यामुळे आडते हवालदिल झाले आहेत.गेल्या कित्येक वर्षांपासून बाजार या ना त्या कारणाने बंद असल्याने पुणे बाजार समितीने तीस कोटी  रुपये खर्च करून बांधलेल्या या उपबाजार समितीचे कामकाजच सुरळीत सुरु होत नसल्याने याच्या उभारणी साठी खर्च केलेले कोट्यावधी रुपये पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. 
        
  मोशी बाजार समितीमध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी गाळे खरेदी केले असून भविष्यातील उद्योजक व्यावसायाच्या दृष्ठीने याकडे पाहत आहे.त्यामुळे अनेक जणांनी गाळे खरेदी केल्या नंतर याकडे ढूकुनही पाहिले नसल्याचे चित्र आहे.तसेच समितीचे देखील बाजारकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे बाजार समितीचे व्यवहार अद्यापही सुरु झाले नाही.परिणामी शेतकरी आपला माल इतर पर्यायी ठिकाणी विक्री साठी नेत आहेत.दैनंदिन बाजार अद्यापही सुरु झाला नसल्यामुळे अनेक गरजू शेतकरी व आडते अडचणीत सापडले आहेत.
           सद्या बाजार समितीमध्ये १५९ गाळे असून फळे भाजीपाला ,कांदा,बटाटा विक्रीसाठी हे गाळे सुरु करण्यात आले.येथील सर्वच गाळ्यांची विक्री झाली असून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने तीस कोटी रुपये खर्च करून हा उपबाजार उभारला आहे.सुरुवातीच्या काळात कामकाज पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत हा बाजार रखडला होता.अखेर उद्घाटनानंतर बाजार समितीमध्ये सुरुवातीच्या केवळ दहा गाळ्यांवरच कामकाज झाले.नंतर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल पुणे मार्केट यार्डातील घाऊक  बाजारात नेण्यास सुरुवात केली.



अशी आहेत कारण …

१) संपूर्ण माल एकाच ठिकाणी मिळत नसल्याने स्थानिक व्यापाऱ्यांची याकडे पाठ

२) पिंपरी व खडकीतील बाजार जवळच असल्यामुळे शेतकरी व्यापारी वर्गाकडून त्याचा  पर्यायी वापर.

३) गाळे खरेदी वेळेस खडकी व  पिंपरीतील ठोक विक्री बंद करण्याचे व्यापाऱ्यांना दिलेले समितीचे आश्वासन फोल.

४) भविष्यातील व्यावसायाच्या दृष्ठीने स्थानिकांची गाळे खरेदी त्यामुळे सद्या शुकशुकाट.

५) समितीचे देखील या उपबाजाराकडे दुर्लक्ष


 (पूर्व प्रसिद्धी पुढारी -पिंपरी -२५ मार्च २०१५ )

गुरुवार, ४ जून, २०१५

अखंड स्थीतीचा निर्धारु…….'रायगड'

                        वृंदावन,मथुरा,काशी आणि रामेश्वर कोणाला
                        ज्या अभाग्याने रायगड न देखिला त्याला…….
 हिंदवी स्वराज्याचे उत्तराधिकारी छञपतींचे थोरले पुञ संभाजी राज्यांनी

राजा शिवछञपतींच्या उपरांत स्वराज्याच्या गादिचा मान स्वीकारताना केलेला रायगडाचा उल्लेख हा निश्चीतच या अफाट दरयाखोरयात ,राना-वनात निर्भीड जंगलाच्या सानिध्यात वसलेल्या किल्ले रायगडचा गौरवच म्हणावा लागेल.
             शिवछञपतींना ज्याने हिंदवी स्वराज्याचे शञिय कुलांवतस होताना पाहिले,राजमाता जिजाउचे जीवन चरिञ ज्या मातीत घडले,ज्याने मातृत्वाची अफाट जिदद् हिरकणीच्या रुपात पाहिली ,ज्याने महाराणी येसुबाईचा महापरक्रम पाहिला आणि ज्याने हिंदवी स्वराज्याची राजधानी हेण्याचा बहुमान मिळवीला  या अशा अनेक स्थितीचा अखंड पणे साशीदार असलेल्या किल्ले रायगडाची सफर आपल्याला हिंदवी स्वराज्याच्या सुर्वण काळात घेऊण जाईल यात शंका नाही.
            कोकण प्रदेशातील रायगड जिल्हयात सहयाद्री पर्वत रांगेत किल्ले रायगड वसलेला आहे .गडावर जाण्यासाठी 1400 पायरया आहेत 18 व्या शतकात इंग्रजांच्या ताब्यात गड आल्यावर इंग्रजांनी या सहयाद्रीच्या स्वर्गाची नासधुस केली.रायगडचे प्राचीन नाव 'रायरी' असे होते. या बलाढ्य किल्ल्याची सफर करायची म्हटंल्यास संपुर्ण एक दिवसाचा कालावधी पुरेसा होतो.
            चला तर घेऊ  महादेवाचे नाव आणि सुरु करु किल्ले रायगडची सहल. हा खुबलढा बुरुज याला पुर्वी चित दरवाजा असेही म्हणत आता आपल्याला दिसतोय तो उध्वस्त बुरुज.
 उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.पुढे गेल्यावर आपल्याला एक दरवाजा दिसतो या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा.या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.:
                 
चित् दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.:पुढे आपल्याला महादरवाज्या लागतो . महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत.
                 महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवडा दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव.तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थेयाच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
              गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्र्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.: स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.: पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

  --:राजसभा :----

 महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा.आजही येथे शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जातो . राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला.हा राज्याभिषेक निश्चलपु
री गोसावी याच्या हस्ते पार पडला.
                   पुढे नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरुन आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता.बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्र्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते.

 शिवाजी महाराज्यांची समाधी :---  
        हि जागा जिथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महराज्यानी चीर शांती घेतली . या बाबत एक ऎतिहसिक नोंद आढळते इंग्रज आक्रमणा नंतर रायगडावरील शिवाजी राज्यांची समाधी जनतेच्या विस्मरणात गेली होती . त्याचा पहिला शोध महात्मा ज्योतीराव फुले यांनी लावला .  मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी.
                       दहनभूमी पलीकडे भग्र इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.: होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.
                    बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरुन टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी.
 आणि हे टोक ज्याने अफाट अश्या मातृत्वाची जाणीव रायगडला करून दिली होय  हेच ते

हिरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते.या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा होती .

चूकवु नहे असे काही ……. !
                  पाचाड खिंडीत रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत.
जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.
या गुहेत सतत एकापाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्गयात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वसतीस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा यांची अपूर्वाई येथे भेट देणाऱ्याला जाणवते.

कसे जायचे …? राहण्याची सोय ? गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ ?
         पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाड गावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायऱ्या चढून गेलो, की रायगडमाथा गाठता येतो. गडावर राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे. त्यास १ मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा ७ ते ८ खोल्या आहेत . राहण्याची सोय विनाशुल्क आहे पण सध्या तिथे कधी कधी ३० रु. प्रती माणूस असे घेतले जातात.गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ पायथ्यापासून चालत गेलात तर २ तास ४० मिनिटे पाळण्याने गेलात तर ५ मिनिटे. आणि हो गडावर जाण्या साठी दोन सोही आहेत एक रोप वे आणि दुसरी आपली पायवाट …

 या सुंदर आणि बलाद्य किल्ल्याची सफर आपल्याला निश्चितच अविस्मरणीय वाटावी अशीच आहे …
  
श्रीकांत बोरावके

     

मंगळवार, २६ मे, २०१५

पुरंधरचा ' शेंदूर '

    शिव छत्रपतींच्या स्वराज्यातील एक बलाढ्य मजबूत गड किल्ले पुरंधर आणि या गडावर निष्ठेची आठवण करू न देणारा शेंदूर बुरुज कोणी त्याला   शेंदऱ्या बुरुज म्हणूनही संबोधतो , किल्ले बांधणीच्या वेळी पद्मावती तळ्याच्या वायवेस बालेकिल्ल्याच्या बाजूला बुरुज बांधताना तो वेळो वेळी कोसळत होता . स्वराज्याच्या संरक्षणा साठी या बुरुजाचे उभे राहणे आवश्यक होते त्या वेळी या गडाला च आपले स्वराज्य आणि कुटुंब मानणाऱ्या येसाजी नाईक चिव्हे यांनी आपला  पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला.कुटुंबाच्या सुखापेक्षा स्वराज्याचे सुख त्यांनी आपले मानले . असा निष्ठावंत शेंदूर बुरुज पाहण्यासाठी किल्ले पुरंधर ला जायलाच हवे
              सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर वसलेले आहे. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्ऋत्येला ६ मैलांवर आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.

  •  बिनी दरवाजा : पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकर्याच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते. त्याचे नाव 'पुरंदरेश्वर'.
  • पुरंदरेश्वर मंदिर : हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपंती धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
  • रामेश्वर मंदिर : पुरंदेश्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशवांच्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथने तो वाडा बांधला होता. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच दिल्ली दरवाजापाशी येतो.
  • दिल्ली दरवाजा : हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात.
  • खंदकडा : दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खंदकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखान्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेने गेल्यावर केदार दरवाजा लागतो.
  • पद्मावती तळे : मुरारबजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
  • शेंदऱ्या बुरूज : पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे. त्याचे नाव शेंदऱ्या बुरूज.
  • केदारेश्वर : केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायऱ्या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहिडा, मल्हारगड, कर्हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
  • पुरंदर माची : आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणाऱ्या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरावखिंडीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात.
  • भैरवगड : याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.
  • वीर मुरारबाजी : बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे..

                                                                                                                        श्रीकांत बोरावके


मंगळवार, १९ मे, २०१५

राजगुरू स्मारकाची उपेक्षा संपणार तरी केंव्हा …!


                   देश स्वातंत्र्य होऊन आज साठी उलटली तरी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांची उपेक्षा संपलेलीच नाही असे वाटावे असेच चित्र सद्या खेड तालुक्यात आहे.२३ मार्च १९३१ रोजी आपले सहकारी भगतसिंग,सुखदेव यांचा सह देशासाठी फासावर जाणाऱ्या शिवराम हरी राजगुरुंची हि जन्मभूमी.२३ मार्च च्या त्या शांत आणि काळवंडलेल्या सायंकाळी हा क्रांतिवीर देशासाठी हुतात्मा झाला परंतु त्यांच्या मृत्यू नंतर प्रकाशमान सकाळ कधीच उगवली नाही. असेच म्हणावे लागेल.कारण त्याचा नावाने प्रमाणित करण्यात आलेल्या राजगुरुनगर तालुक्यात त्यांचेच स्मारक निधी,आणि भ्रष्ठाचार यांच्या गर्दीत गुरफटले आहे.
                   अजूनही त्यांच्या स्मारकाचे सुमारे नवद्द टक्के काम बाकी असून या बाबत कसलाच पाठपुरावा होत नसल्याचे चित्र आहे. जी उभारले आहे त्यात ही निकृष्ठ दर्जा आहे गेल्याच पावसाळ्यात वाड्यातील अंतर्गत जमीन खचली होती.संरक्षक भिंतीचे काम हि अपूर्ण आहे .राजगुरूंचा पुतळा हि मेघडंबरी विनाच उभा आहे तो हि एवढ्या मोठ्या नगरीत दिसून न येण्या इतका अगदी कापसाच्या गादीत सुई ठेवल्या सारखा. 
                  जमिनींचे वाढते दर,औद्योगिक वसाहती ,खेड शेज,या आणि अशा विविध कारणांतून प्रसिद्धीत असलेल्या खेड तालुक्यात आणि राजगुरुनगर मध्ये हुतात्मा राजगुरूंचा केवळ दीड ते दोन फुटांचा अर्ध पुतळाच असणे हि अत्यंत खेदाची बाब आहे. दुसरीकडे तालुक्यात इतर महापुरुषांचे पुतळे अत्यंत आकर्षक आणि थाटामाटात उभे असून राजगुरुंच्याच पुतळ्याची आणि स्मारकाची अशी उपेक्षा का असा प्रश्न उपस्थित होतो.
                    त्यांच्या हुतात्मा दिनीच सर्वांना पुतळ्याची आणि स्मारकाची आठवण येईल मग पुन्हा विचारांचा जागर होईल. आश्वासनांची खैरात होईल आणि पुन्हा सगळ शांत हि… ! हि गेल्या कित्येक वर्षांची कैफियत आहे ती  बद्दलायला हवी तरच स्मारकाची आणि खऱ्या अर्थाने राजगुरूंची उपेक्षा थांबेल अन्यथा या देशा वर पुढे जीव द्यायला आणि देशा साठी जीव घ्यायला माणस उभी राहणार नाहीत अशी  हि शक्यता नाकारता येत नाही.

कोण्या एका कवीची ओळ या वेळी अधोरेखित करावीशी वाटते 


"सरणावरती आज आमची पेटताच प्रेते 
उठतील या ज्वालान मधुनी भावी क्रांतीचे नेते. 
लोह दंड तव पाया मधले खळा खळा तुटणार आई खळा खळा तुटणार 
गर्जा जय जय कार क्रांतीचा गरजा जय जय कार "

वरील कवितेचा भावार्थ पाहता खरच त्यांचा हुतात्म्याला खरी श्रद्धांजली ना तुम्ही आम्ही देऊ  शकलो ना राज्यशासन ना भारत सरकार देऊ शकले त्यांच्या स्मृती अजूनही तशाच आहेत उपेक्षितच … हि उपेक्षा संपवण्यासाठी स्थानिक तरुण प्राणपणाने प्रयत्न करतायेत हिच जमेची बाजू . नाही तर बाकी सगळी नाणी खोटीच असेच म्हणावे लागेल .
 
:-  श्रीकांत बोरावके.

( प्रसिद्धी दैनिक जनप्रवास,पुणे २२-०३-२०१४ )

सोमवार, १८ मे, २०१५

माझे जीवाचे आवडी पंढरपुरा नेईन गुढी …… !


एकदा तरी अनुभवावा असा पालखी सोहळा यंदाहीमार्गस्थ होईल .आशिया खंडातील सर्वात मोठा पायी वारी सोहळा म्हणून ज्याचा उल्लेख करावासा वाटतोतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संततुकाराम महाराज पायी वारी पालखी सोहळा होय.अत्यंत तळमळीने यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वैष्णावास पंढरीची ओढ लागलेली असते आणि त्याच एका ओढीने मार्गावर चालताना त्यांना कसलाही थकवा जाणवत नाही हे विशेष.  त्याच प्रमाणे या वारीत चालणारे अनेख भक्त हे हौसे,गौसे,नवसे असतात हे तितकेच खरे आहे.आपल्या रोजच्या जीवनापेक्षा काहीतरी हटके व वेगळे करू इच्छिणारे तरुणही या वारीत सहभागी असतात आणि या हि पेक्षा यात सहभागी असतो तो बळीराजा ज्याला आपले शेत पावसाच्या पाण्याने चिंब भिजावे वाटते. अशी आर्जव घेऊन तो त्या वाटेला चालत असतो. वारीत असतात लहान मुले ज्यांची भक्ती हि निर्लभ असते ज्यांचा प्रवास ज्या निर्लभतेने सुरु असतो त्याच निर्लभतेने संपतो त्या सावळ्या कानड्या विठ्ठला जवळ या बालकांचे काहीही मागणे नसते या मुळे ज्या आनंदी ते मुद्रेने यात सहभागी असतात त्याच आनंदी मुद्रेने वारीच्या शेवटापर्यंत असतात.अशी हि वारी प्रत्येकाला काही तरी बोध देणारी जगण्याची शिदोरी देणारी असते.आता हेच पहा न वारीच्या प्रवासात ऊन,वारा,पाऊस आणि खडतर रस्ते लागतात यात कधी कधी पायही थकतात पण क्षणभर विश्रांती घेऊन वारकरी पुन्हा वाटचाल सुरु करतात कोणत्या आशेने तर त्या पंढरीच्या आशेने हेच तर जीवनाचे गमक आहे.आपले ध्येय,जीवन कार्य एकदा ठरवले कि मग कितीही खडतर रस्ते येवोत पण आपल्या द्येयापार्यंत पोहचायचेच हे शिकवणारी हि वारी आहे.वारी बरेच काही सांगून जाते आपल्या वाटचालीत वारी समतेचा संदेश देते,वारी जाती अंताची आरोळी देते.या वारीत विविध जाती धर्माचे लोक आस्थेने सहभागी होतात.  इथे वेगळा विदर्भ नसतो कि वेगळा कोकण इथे प्रत्येक जन आपण एकच वैष्णव आहोत .या एकाच भावनेने एकरूप झालेला असतो याच मुळे कितीही जातीय दंगली घडवल्या तरी हा महाराष्ट्र त्या दंगलिंला भिक घालत नाही तो समतेचा आणि पुरोगामित्वाचा आपला वसा जोपासत राहतो.या वारीचा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण मद्य आहे. महाराष्ट्र म्हंटल कि वारी आणि वारी म्हंटल कि महाराष्ट्र हे जणू प्रत्येक पर्यटकाच्या विदेशी व्यक्तींच्या मनावर गोंदूनच गेले आहे.  आजही या वारीत परदेशी पर्यटक आस्थेने सहभागी होत असतात .  
                          वारी अनेख संधी हि प्रधान करते नवे काही शिकण्याची, रोजगाराची…पालखी मार्गावर भक्तांच्या सोयीसुविधा उपलब्ध करताना अनेख छोठे छोठे व्यवसाय बेरोजगारांसाठी उपलब्ध होत असतात त्यातील येणारे उत्पन्न निश्चितच नवा कायमस्वरूपी व्यवसाय उभारण्यासाठी उपयोगाचा ठरणारा असतो.वारीबरोबर चालणारे अनेख भक्त आपला परंपरा गत व्यवसाय जोपासताना दिसून येतात अगदी उल्लेखच करावासा झाला तर या वारीत सहभागी झालेले नाभिक सामाज्याचे लोक ज्यांचा व्यवसाय हि जोपासला जातो आणि भक्तीभाव सुद्धा.हि वारी कलेलाही दाद देणारी असते या वारीत काही ठिकाणी मुक्कामी तमाशा फडही वारकर्यांच्या करमणुकी साठी असतात या बरोबरच वारीतील काही वारकरी भारुडही सादर करतात एका अर्थाने वारी म्हणजे महाराष्ट्राची लोकसंस्कृती दाखवणारी एक मोठी फेरीच असते जी समृद्ध महाराष्ट्राचा वसा आणि वारसा सांगते.अशी हि सर्व गुण संपन्नवारी एकदा तरी अनुभवावी अशीच आहे. याच साठी प्रत्येक वैष्णव मोठ्या आनंदाने म्हणत असतो ''माझी जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी'' .जी आपल्या जीवाला आनंद,प्रेम आणि सुंदर प्रेमळ सहवास देते ती वारी आणि गुढी रुपी झेंडा त्या पंढरपुरास नेईलच अशी भावना त्या प्रत्येक भक्तात असते जो काम,क्रोध,लोभ,आणि मत्सर सोडून या वारीत चालत असतो. 
                                                                                                 : -   श्रीकांत बोरावके

(प्रसिद्धी :- दैनिक जनप्रवास,पुणे २५-०६-२०१४)

काही तरी हिशोब चुकतोय …?

श्रीकांत बोरावके
---------------------------------------------------------------------------------------------
                                  जगाचे  पोट भरणाऱ्या बळीराजाला विरंगुळा नसतो का ? कि त्याला मन नसतेच असेच असेल कारण मन असते तर त्याच्या या मनाचा विचार निदान त्या प्राणी मित्र संघटनानी केलाच असता . प्राणी मित्र संघटनांचे म्हणणे निदान तूर्तास खरे
मानू या... विचार करा ? आता बैल गाडा बंदी झालीच फेरविचार याचिका हि बळीराज्याच्या विरोधात गेली मग काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी एक शर्यतींवर अवलंबून असणारी आर्थिक घडी कोलमडून जाईल ,दोन या वर उभे राहिलेल्या ग्रामीण भागातील तरुणांचे लघु व्यावसाय बंद होतील ,तीन आणि अगदी महत्वाचे ज्या शेतकऱ्यांकडे शेतीचे सोडून इतर गाड्याची बैले आहेत त्यांचे पुनर्वर्सन कोठे व कसे करणार ,चार बाजारात ही बैलांची खरेदी मंदावेल, ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडेल मोठ्या प्रमाणात रक्कम लावून खरेदी केलेली बैले मातीमोल किंमतीत विकावी लागतील याचा फटका खिल्लार जमाती जोपासून उत्पन्न कमावणाऱ्या शेतकऱ्यांना होईल.अशा बैलांची निगा राखण्यासाठी वेतनावर काम करणारे मजूर बेकार होतील.शेतीची कामे करून फावल्या वेळेत शर्यतीत मग्न होणारे तरुण वाटा चुकतील कारण जीवनात केवळ कष्ठ हा एकच पर्याय समजणाऱ्या ग्रामीण तरुणांचा हाच विरंगुळा होता तोही बंद झाल्यावर इतर विरंगुळ्याच्या वाटा कोणत्या ? हो आणि सर्वात महत्वाचे या सर्वान मुळे  ग्रामीण यात्रेचा परंपरेचा पारंपारिक ठेवा कायमचा हिरावणार आहे त्याच काय ? पुण्या मुबंईला स्थाईक झालेली ग्रामीण जनता निदान या यात्रेच्या काळात आपल्या गावाची वाट धरायचे ती वाट हि आता बद्दलली जाईल . 
                                   मा.सर्वोच्य न्यायालयाच्या म्हणण्यानुसार पृथ्वी तलावर प्रत्येक प्राण्याला आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा नैसर्गिक हक्क आहे . या मुळे कोणत्याही प्राण्याचा अमानुष छळ कायद्याने गुन्हा आहे. आणि म्हणूनचं या विचारांचा आधार देत मा. सर्वोच्य न्यायालय शर्यत बंदी करते आहे . परंतु या बंदीचा होणारे  विपरीत परिणाम न्यायलया समोर मांडायला हवेत  ते  असे  कि इतक्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बैलांची शर्यत बंदी मुळे गरजच संपल्यावर  त्यांचे पुनर्वर्सन कोण करणार ज्या शासनाला अद्यापही गाईंचे पालनपोषण यथोचित पणे करता आले नाही ते बैलांचे पालन पोषण कसे करणार.  आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या मशागती साठी बैलांची गरज आता नगण्यच राहिली होती.  त्यात त्यांचा वापर शर्यतीत होत होता तो हि बंद झाल्यावर त्यांची काळजी कोण आणि कशासाठी घेईल.
                                    स्वत: जाडे भरडे गहू खाऊन बैलांना मैद्याची कणिक खायला घालून शर्यतीत उतरवणारा बळीराजा कोणाला दिसत नाही,घरातील व्यक्ती मयत झाल्यावर ज्या प्रमाणे दु:खवटा पाळला जातो त्याच  प्रमाणे आपला शर्यतीतला बैल मयत झाल्यावर त्याची दशक्रिया आणि दु:खवटा पाळणारा बळीराजा कोणाला दिसत नाही आणि घरात खायला मीठ नसतानाही बैलाची नीठ निघा राखणारा बळीराजा तर कोणालाच दिसत नाही सर्वांना दिसतो तो अमानुष छळ करणारा आणि केवळ बैलांचे हाल करणारा क्रूर शेतकरी या विदारक अवस्थेचा सर्वांगाने विचार व्हायला हवा अन्यथा मिळालेला न्याय हा  अन्याय वाटण्यास वेळ लागणार नाही . प्राणी मित्र संघटनांची बाजू जरी  विचारात घेतली तरी काही राज्यांच्या प्रमाणात महाराष्ट्रात शर्यतीत बैलांचा छळ कमी प्रमाणात होतो हे सत्य नाकारता येणार नाही . शर्यतीत काही प्रकार अत्यंत सुंदर आणि छळ विरहित आहेत त्यांना तरी निदान या बंदीतून वगळायला हवे नाहीतर कुठे तरी सर्वांचाच हिशोब चुकतोय असेच म्हंटल तर वावग ठरू नये . अर्थात फेरविचार याचिकेवर मा.सर्वोच्य न्यायालय सर्व हिताचाच निर्णय देईल यात शंका नाही .

(पूर्व प्रकाशित : दैनिक जनप्रवास ,पुणे १०-०५-२०१४)

सुरवात एका वादळाची ……!

                         सह्याद्रीच्या निर्भीड दऱ्या खोऱ्याना साक्षी ठेवून या मावळ मातीतील सवंगगड्यांना सोबतीला घेऊन. छत्रपती शिवाजी राज्यांनी रोहीडेश्वरावर घेतलेली स्वराज्याची शप्पथ म्हणजे तत्कालीन मोगल साम्राज्या विरोधातील एक वादळच होते . या वादळाची सुरुवात महाराज्यांनी ज्या गडाच्या विजयाने केली . तो हा झुंजार किल्ले तोरणा ……पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला एक बलाढ्य किल्ला . तोरणा आजही एक शांत आणि निसर्ग रम्य स्थान म्हणून पर्यटकांना भुरळ घालतोय . तोरणा म्हणजे एक गिरी दुर्ग प्रकाराचा जमिनी पासून उंची साधारण १४०३ मीटर मध्यम चढाईचा हा गड याला कोणी तोरणा म्हणत तर कोणी प्रचंडगड . शिव विजया मुळे या किल्ल्याचे नाव तोरणा पडले असे म्हंटले जाते परंतु गडावर तोरण नावाची वनस्पती आढळते म्हणून याला तोरणा असे नाव पडले असे ऐतिहासिक ग्रंथात नामोउल्लेख आढळतो.पुढे राज्यांनी या वर विजय संपादन केल्यावर याचे नाव बदलून प्रचंड गड असे ठेवले . गडाच्या दक्षिणेस वेळवंडी नदी तर उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे.गडाच्या पश्चिमेला कानद खिंड ,पूर्वेला बामन व खरीव खिंडी आहेत . गडाचा विजय आणि गडाचे नाव याचा साधर्म्य संबंध नसला तरी येवढे मात्र खरे आहे कि हा गड सर करूनच शिव छत्रपतीनी स्वराज्याचे वादळ उठवले आणि बघता बघता हे वादळ दिल्ली च्या तक्ता पर्यंत पोहचले ….पुढे पेशवाईत याच वादळाने अटकेपार झेंडे रोवले .
                        गडावर प्राचीन वस्तूंची सध्या मोडकळीस आलेली अवस्था आहे . सर्व वाडे , बुरुज , व इतर ठिकाणांची नासधूस झाली आहे . तरीही या ''तोरण्याचे तोरण सौंदर्य क्षणमात्र हि कमी झाले नहिऎ हे विशेष ''.या  ''सौंदर्याकडे केवळ पाहायला नाही .जगायला या येथून दिसणारा सूर्योदय तुम्हाला नवीन जगण्याची उर्मी देईल तर येथील सूर्यास्थ आपल्याला  उगवती ते मावळतीचे क्षण एकाच क्षणी दाखवेल यात शंका नाही'' . 
या गडाच्या एकंदरीत रचणे वरून हा शैवपंथी यांचा आश्रम असावा,इ.स १४७०ते १४८६ च्या दरम्यान हा गड बहमनी राजवटीत मलिक अहमद ने जिंकला पुढे निजामशाहीत व तद्नंतर महाराज्यांकडे आला. महाराज्यांनी गडावर इमारती बांधल्या आग्र्यावरून सुटकेनंतर राज्यांनी गडाच्या    जीर्णोधारासाठी रुपये ४ हजार होन खर्च केला होता.संभाजींच्या वदानंतर गडावर मोगलांचे राज्य आले . पुढे सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड मराठी छत्र छांयेत आणला . या गदा बाबत ची एक महत्वपूर्ण आठवण अशी कि संपूर्ण भारतावर अधिराज्य निर्माण करणाऱ्या औरंगजेब बादशहाला महाराष्ट्रातील केवळ हा एकमेव किल्ला स्वत:जिंकता आला महाराज्यांच्या केवळ एकाच गडावर विजय मिळवून त्याला समाधान मानावे लागले .
                      या तोरणा गडावर विशेष पाहण्या सारखे काही नाही जे आहे ते हिंदवी स्वराज्याचे वैभव सांगणारे लाल मातीचा गुणधर्म ऎकवनारे आणि निसर्गाच्या सानिध्यात नेणारे असेच आहे . 

                                                                                                               -: श्रीकांत बोरावके