गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

कळा ज्या लागल्या जीवा

                     कोणा एका श्रीमंताच पोर अनवाणी कडक ऊन्हात फिरायला निघाल आणि कडक ऊन्हात त्याच ते पाय पोळुन निघाले तेव्हा ते घरि येऊन वङिलांना म्हणाले कि साऱ्या रस्त्यावर चांमडे अंथरा जेणे करून माजे पाय पोळणार नाहीत.या वर तो श्रीमंत म्हणाला अरे माझ्या सोनुल्या त्या परीस तु तुज्याच पायात चप्पल घाल जेणे करून तुजे पाय पोळणार नाहीत.खर तर गोष्ट साधी व सोपी आहे पण त्याचा मतितार्थ वेगळा घेण्याची गरज आहे.स्वताच्या पायाला चप्पल असल्याने जगाला बसणारे चटके जाणवणार नाहीत हा उपाय असला तरी ऐक पळवाटच म्हणावी लागेल सामाज्यापासून दूर जाण्याची.

                     आज राज्यावर पाणीटंचाईच भीषण संकट उभे आहे.परंतु ते आमच्या वर न ओढवल्यान आम्ही आजही धूलवड साजरी करतोय.दुष्काळाची झळ ना  कळ प.महाराष्ट्रला आणि विशेषता पुण्याला बसत नसल्याने त्याची खंत आम्हा पंताना कश्याला..! असच म्हंटल जातय 
           दुष्काळ पाहताना दिसणार द्रुष मनाला टोचत आणि तेव्हा बोचत हे कि पाणी प्रश्नावरही राजकारणाची पोळी भाजली जातेय.आज भेडसावणारा प्रश्न बिकट आहेच पण याचे सोयरे ना सुतक राजकारण्यानला आहे का असतेच तर दिमाखदार शाही थाटातील विवाह सोहळे,अभिष्टचिंतन सोहळे,साजरे करून त्या वर घोडे नाचवले नसतेच.जनतेचे प्रश्न हे A.C हॉल मधे बसून सुटत नसतात त्या साठी शेतकरयांच्या गोठयापर्यंत नाळ जोडलेलीच असावी लागते हे विसरले गेल्याचे जाणवते.

                  दुष्काळावर उपाय अनेक होते वा आहेत पाणी पंचायत,पाणलोट क्षेत्र विकास व इतरही अनेक पण यातील कोणती सूत्र अंमलात आणली गेलीत ? गेलीत ना  जलसिंचन घोटाळ्याची. आणखीनही काय वाढून ठेवलय याचीच सामान्य माणूस आशा करतोय व स्वताची झळ स्वताच सोसतोय प्रसंगी कवी भा.र.तांबे यांच्या ओळी सत्याची जाणीव करून देतात.
                            कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या
                        कुणाला काय हो त्याचे,कुणाला काय सांगाव्या                       उरी हा हात ठेउनी, उरीला शुल का जरी     
                   समुद्री चहूकडे पाणी ,पिण्याला थेंबही नाही ....! 

(प्रभात,कॉलेज कनेक्ट  २२ फेब्रु २०१३ )                                                    

तरिही प्रेमाचा गुलकंद तसाच.....!
       आमची युवा पिढी पुर्वी प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबी पञांचा वापर करत  पुढे आमच्याकडे मोबाइल आले आणि आमच्या प्रेमात आधुनिकता आली त्याहि पुढे फेसबुक,नेट आले एका likeवर प्रेमाचे बहर सुरु झाले.
          परंपरेने चालत आलेल्या काण्हेरी,मोगरयाच्या फुलांची जागा गुलाबाने कधी घेतली कळलेच नाही. पुर्वी प्रेम,लग्न व नातेसंबध जुळले जायचे आता त्याही पुढे जावुन आम्ही हि परंपराच खंडित केली. लिव  इन रिलेशनशीप हि प्रेमाची गरजच बनवली.अगोदर बघणे,पसंद करणे सहवासात राहणे योग्य असेल तरच जीवनभर सोबत राहणे हि संकल्पणा एका दृष्टिने आपल्या संस्कृतीला तडा देणारिच पण तरिही आधुनिकतेनुसार योग्यच कारण काळा बरोबर बदलण हा माणसाचा नियम आहे अथवा इतिहास जमा गोष्टिणवर भविष्यकाळ ठरत नाहि हेही तितकेच खरे आहे.
         मोगरयाच्या जागी गूलाब येवो वा सामाजीक नातेसंबध परंपरेला छेद देत रिलेशनशीप येवो तरिही येवढे माञ निच्छित कि प्रेमाचा गुलकंद पुर्वी तोच होता आणि आजही तसाच मधुर आहे......!!!!
मला मायभूमी कुठे आहे ...?

                      सुमारे पाच एक दशकांपूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हे चारच शब्द उच्चारले आणि हजारो वर्षे एका विषम 
समाज परिस्थितीच्या पोटात घुसमटलेली भावना ज्वालामुखीचा स्पोट घडवुन गेली.आज कदाचित विषय वेगळा ,व्यवस्था वेगळी असो 
वा वातावरण वेगळे असो पण हाच प्रश्न कालही तसाच होता,आजही तसाच आहे,आणि कदाचित उद्याही तसाच असेल.
                              आपली राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाटी प्रत्येक गोष्टीला विरोध करणे हा तर पायंडाच पडत चालल्याचे दिसून येते.
 आपल्या विरोधाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय याचे भानही यांना नाही.अशाच कुटील राजकारणाची झळ कमल हासन च्या विश्वरूपम ला बसली .सिनेमाला sensor  ने हिरवा कंदील दाखवला असूनही धार्मिक,राजकीय संघटनांच्या मूर्ख पणाला बळी पडाव लागत हि अतिशय खेदाची बाब आहे.या अश्या विरोधाचा फटका या आधी हि अनेक कलावंताना बसला आहे.कलेतील काही कळो ना कळो पण तरि ही विरोध करून कलाकृती रोखल्या जातात तरीही शासन मात्र मुग गिळून गप्प बसते एखाद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते तेवा हे लोकशाहीचे रक्षक गप्प का बसतात ?
                               हि परस्थिती म्हणजे या समाजच स्वास्थ ढासळत असल्याच घोतक आहे.याला अधिक खत पाणी घालण्याचा जो प्रयत्न सुरु आहे तो हाणून पाडण्याची आज गरज आहे.अन्यथा बाबा साहेबांचे हे बोल स्वातंत्र्या नंतर हि तेवडेच जिवंत रहिल्या शिवाय वेगळे काही वाटत नाही व ज्या देशाचा नागरिक संतुष्ठ नाही तो देश रसातळाला गेल्या शिवाय राहत नाही याचे भान शासनाने ठेवले पाहिजे.कारण ज्या युवा पिढि वर उद्याचा सक्षम भारत उभा आहे त्याच तरुणाईच्या स्वातंत्र्यावर गदा आल्यास हा देश महासत्ताक होणे केवळ स्वप्नच राहील.आणि याच बरोबर चांगल्या कलाकृती घडत नाही याची ओरडही सुरुच राहील.कलेला राजाश्रय असल्या शिवाय ती टिकत नाही हा इतिहास आहे.तो भविष्य काळ न व्हावा हिच अपेक्षा ..
 
प्रभात ,कॉलेज कनेक्ट  दिनांक ०७ फेब्रुवरी २०१३
नाक दाबा तोंड उघडेलच ...!
                    आता पर्यंत भारताने केवळ शांततेची कबुतरे सोडली आहेत परंतु त्याच्या  उत्तरा दाखल पाकिस्तानणे आपल्याच हद्दीत येउन आपल्याच सैन्याचे शीर छाटून नेण्याचे धाडस करणे म्हणजे पाटीमागून वार करण्या सारखेच आहे.सीमेवरील धाडस कमी कि काय म्हणूनच एक प्रकारचा धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न  मलिक यांनी केला.खर तर आजपर्यंत स्वताच्या पाकिस्तान मधेच कितेकदा त्यांच्याच खेळाडूंला ला सामना हरले म्हणून मार वा द्वेष दिला गेला आहे.त्या वेळी जर भारताने या वर वक्तव्य केली असती तर याच पाकिस्ताने त्याचा मोठा बाऊ केला असता.भारत शांतता प्रिय,संयमी देश आहे म्हणून कोणीही उठून भारता बाबत बोलावे हा पायंडाच पडला आहे.यात अमेरिका हि कमी नाही वा पाकिस्तान.
         भारता कडून होणारी सर्व मदत ,व्यापार ,वा क्रीडा सामने तात्काळ बंद करावे जेणे करून ''नाक दाबले कि जगण्यासाठी तोंड उगडलेच जाते'' त्या प्रमाणे पाकिस्तान पुढे अडचणी उभ्या राहिल्या शिवाय त्यांचा हा उधळआपट पणा थांबणार  नाही.आता वेळ केवळ येणाऱ्या संकटाना पेलण्याची नव्हे तर आव्हान देण्याची आहे.बाह्य सिमेवरी वातावरण गरम करून अंतर्गत शांतता भंग करण्याचा प्रयत्न अश्या धार्मिक  बाबींवर 'शाहरुखचे' पात्र उभे करून पाकिस्तान करत आहे.एकंदरीतच पाकिस्तानणे स्वताचे घराचे वासे मोजावे तेच भक्कम करावेत.दुसर्याच्या घराच्या वाशांची काळजी न करणेच योग्य ठरेल. 
प्रभात ,कॉलेज कनेक्ट  ०२ फेब्रुवारी २०१३
पाश्चिमात्यांचे अनुकरण कशाला ? 
                    
                   खर तर ज्या संस्कृतीचे गोडवे जगभर गायले जातात त्या भारतीय संस्कृतीत आज पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्याची परंपरा कुठून आली हेच कळत नाही.
भारतीय संस्कृतीत अशी काही सन आहेत कि त्यांचे थ्रिल अनुभवल्यास या अश्या वेगवेगळ्या डे न ची गरजच पडणार नाही.परंतु आपल्या संस्कृतीतले लावण्य न शोधता विदेश्या
प्रमाणे त्या वेगवेगळ्या वेशभूषा करून,डे साजरे करून काय हाती येत .उलट आपली संस्कारक्षम संस्कृती जाऊन बेजबाबदार संस्कृती निर्माण  करण्याला खतपाणी घातल्या सारखच नाही का ?
ज्या गोष्टींचे डे साजरे केले जातात .अश्या गोष्टी रोजच्या जीवनात जगण्या सारख्याच आहेत पण तरी हि आपण या डेज ला विशेष महत्व देताना दिसून येतो.
           आचार्य अत्र्यांच्या म्हणण्या नुसार ''ब्रिटीश लोक म्हणत कि देश देऊ पण शेक्सपियरच वाड्मय नाही ''.त्यांना आपल्या संस्कृतीच्या पाउल खुणांच कौतुक आहे.
 पण आम्हास आमच्या महत्वाच्या परंपरेचे महत्वच नाही.वंचित,पूजनीय घटकांना पुजून दिवस साजरा करण्याची परंपरा आपल्या कडे असताना वेगळे डे साजरे करण्याकडे कल का ..? 
                          पाश्चिमात्यांचे अनुकरण नको कारण हि भारतीय संस्कृती आहे.जिथे आयुष्य भर माया करणाऱ्या आईची जागा  डे मधे नसून ती हृद्यात आहे.जिथे वर्षभर राबणारया बैलाचा पोळा घालून आदर व्यक्त केला जातो,जिथे शेतीचे उंदरान पासून राखण करणाऱ्या नागाची पंचमी साजरी केली जाते.जिथे महापुरुषांच्या सन्मानार्थ शिक्षक दिन ,बालदिन साजरे केले जातात .आपण यांना महत्व न देता  पाश्चिमात्यांचे अनुकरण करून विदुषकी वस्त्रे परिधान करून,प्रेम व्यक्त करण्याला खास दिवस देऊन आपल्या सणानला जागतिक महत्व देतो का याचा विचार व्हायला हवा .खर तर आजचा तरूण प्रेम व्यक्त करण्या साठी वेलेनटाईन डे ची वाट पाहतो का..? तरी पण अश्या दिवसांनला साजरे करून आपण कोणती परंपरा जपतो..? आपण या पेक्षा आपली संस्कृती जगापुढे मांडली पाहिजे जेणे करून ते आपले अनुकरण करतील आपण नव्हे.
 
श्रीकांत बोरावके ,दिनांक  ०३ जानेवारी २०१३



न्यायव्यवस्थेत बदल हवा.....!
                              
                      सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे पेपर हतात घेतला आणि देश कुठेतरी थांबल्या सारखे वाटले.दिल्ली मधील घटना आपल्या पुण्यातील घटना किवा मुंबईतील घटना असो यावरून हे स्पष्ट होते कि २१ व्या शतकात देखील स्त्री सबला नाहीच.समाजात पुरुषांच्या खांद्याला खांदा  लावून काम करण्याची त्यांच्यात उर्मी आहेच तरीही  एका प्रकारच्या धुसर भीती खाली त्या अजूनही असल्याचे दिसून येते.असे का होते कारण  आमच्या देशात याबाबतच्या गुन्ह्यांवर कठोर शिक्षाच नाही.आणि असली तरी त्याची अंमल बजावणी जलद गतीने होतच नाही.                                                          
                                                          सोळाव्या वर्षी बलात्कार होतो
                                                          साठाव्या वर्षी तिला न्याय मिळतो
                                                           मिळालाच आरोपी तर ठीक....
                                                           नाहीतर संन्याशीच फाशी जातो.
 
हि आपल्या न्यायव्यवस्थेची पद्धत आहे.
                                                     देशात दर ५४व्या मिनिटाला एक बलात्कार तर २६व्या मिनिटाला एक विनयभंग २०व्या मिनिटाला एक अपहरण व १०व्या मिनिटाला एक छेडछाड होतच असते.असे हे सर्वेक्षणातील  आकडे बोलतात.काय हे..? 
                      जिथे विकासाची,उत्पनाची आकडेवारी कमी होताना दिसते तिथे मात्र या अश्या अपराधांचे आकडे वाढताना दिसून येतात बस्स आता तरी यावर वचक हवाच कायद्यात अशी शिक्षेची तरतूद हवी.कि असे गुन्हे करण्यात कोणी धजावणारच नाही.नाही तर पूजा जाधव प्रकणातील आरोपी हा पुराव्या अभावी निर्दोष सुटलाच नसता .इथे पुरावे ग्राह्य धरले जातात प्रत्यक्ष कृती नाही .यात सुधारणा आवश्यक आहे.
                    समानतेच्या बुरख्या खाली मासिक पगार आणणारी स्त्री जरी बाहेरून आनंदी दिसत असली तरी तिची पराधीनता लपत नाही ...वा ..लपविता येत नाही.
हे वास्तव आहे. आणि शासन कसल्या संरक्षणाची हमी देते.संरक्षण खरेच असते तर त्या कोवळ्या कळीला रिंकू पाटीलला शारधामातेच्या मंदिरात भर दिवसा सुर्यनारायणाच्या साक्षीने जाळले गेले नसते.हि विकृती नवे प्रवृत्ती आहे.स्त्री हि गुलाम असाह्य अबला,उपभोग्य वस्तू ,तिनी काळ परावलंबी ह्या अश्या शिकवणीतून बत्तीस शिराळ्याची आरती जोशी ,जळगावची सारिका, पुण्याची जानवी तुपे ,कागलची मानसी शहा ,मनमाडची सुनिता जोख्ररे, सांगलीची अमृता देशपांडे  जिच्यावर चित्रपट निघाला पण.. न्याय नाही. मुंबईच्या रस्त्यावर सर्वासमक्ष जाळले ती विद्या प्रभूदेसाई .या इतिहास जमा झाल्यातरी त्यांना न्याय मिळाला नाही .तर नव्यांची काय दशा ..!
                 केवळ इंडिया गेटच्या चॊथर्यावर मेणबत्या लाऊन ,वा पोटभर खाउन एकतास निषेद करून ,फेसबुक वर प्रतीक्रियाचा भडीमार करून, सरकारला नादान ठरून ,सर्वेक्षणाचे आकडे जाहीर करून भागणार नाही तर कायद्यात सुधारणा करून शिक्षेची अंमल बजावणी जलद गतीने व्हावी हि अपेक्षा आहे.
         अन्यथा लोकशाही असली तरी न''तोंड चालून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळवणे'' कधीही उत्तमच हे सूत्र अंगीकारनेच योग्य ठरेल का ?  
 
 
श्रीकांत बोरावके , दिनांक २० डिसेंबर २०१२ 

 ( वरील लेखाचा संपादित भाग प्रभात मध्ये २२ डिसेंबर २०१२ च्या कॉलेजकनेक्ट पुरवणीत प्रसिद्ध )
क्रिकेटचा ''भाऊ'' गेला.......!
                    कोल्हापुरच्या ज्या लाल मातीत मल्ल तयार होतात त्या मातीत हा  क्रिकेटचा विक्रमवीर तयार झाला..
भारतीय क्रिकेट विश्वातील 'विक्रमाचा बादशाहा' समजले जाणारे.जुन्यापिडीतील खेळाडू  भाऊसाहेब निंबाळकर आज आपल्यात नाही.त्यांच्या जाण्याने तरुण खेळाडूंचा आधारवड हरपला असेच म्हणावे लागेल.
                   सद्या क्रिकेटला लागलेल्या ग्रहणाबद्दल त्यांच्या मनात सदैव खंत असायची.कसोटी संघात 
स्थानन मिळूनही इतरांनला तीथ पर्यंत 
 पोहचवण्याचे कार्य या तपस्वीने केले.हा विक्रमवीर आपल्या आयुष्यातील करीयर व जीवनातील सकारात्मक शिदोरी जाताजाता तरुण खेळाडूनाही देऊन
 गेला.हार न मानता ध्येया पर्यंत पोहचण्याची सचोटी त्यांच्या जीवनातून पारखण्या जोगीच होती.
                    निवृत्त्ती नंतरही क्रिकेट तपश्चर्येला त्यांनी विरामही दिला नाहीच परंतु सद्याच्या निवृत्त खेळाडूं सारखे इतरांच्या निवृत्त्तीचे भाकीतही वर्तवले नाही वा एखाद्याच्या खेळावर विनाकारण टिकाही केली नाही.आपल्या वेळेस नाबाद ४४३ धावांचा विक्रम त्यांनी नोंदवला व त्याच बरोबर प्रथमश्रेणी
 सामन्यातील 'सर डॉंन ब्रॅडमन' चा ४५२ धावांचा विक्रम हि विरोद्धी संघाच्या माघारीने होताहोता राहिला.त्यांच्या क्रिकेट विश्वातील कामगिरी बद्दल कोल्हापूर मनपाने
 त्यांना ''कोल्हापूरभूषण'' पुरस्काराने सन्मानित केले.राष्ट्रीय पातळीवरील ''सी.के.नायडू''  हा पुरस्काराही त्यांला सन्मानाने देण्यात आला.चित्त्या सारकी नजर व चपळाई
 याचा ते खेळात उपयोग करत.उत्तमतोम फलंदाजा बरोबरच ते उत्तम गोलंदाजही होते.
 प्रशिक्षक म्हणून  या क्षेत्रात त्याचं योगदान गुरु पेक्षा भावासारके  होते म्हणून त्यांची नाळ तरुणाईशी जोडली गेली ती अखेर पर्यंत.
                   खेळाडू हा नियम शेवट पर्यंत जपत वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जगाचा निरोप घेऊन त्यांनी  एक खेळाची परिक्रमाच पूर्ण केली.
एकाद्या कुटुंबातील आदरणीय व मार्गदर्शन करणाऱ्या  व्यक्तींना भाऊ म्हंटले जाते तरुणाईचा क्रिकेट क्षेत्रातील आधारवड,भावाप्रमाणे खेळाडूला
समजून घेण्याची वृत्ती यांमुळे त्यांच्या जाण्याने  क्रिकेटचा भाऊ गेला असे म्हणणे वावगे न ठरावे...! 
                                                                                                                    
- श्रीकांत बोरावके,दिनांक १२ डिसेंबर २०१२
भारतीय ऑलम्पिकची इतिश्री ..........?                 
               खर तर  राजकारण्यांना आता क्षेत्र कमी पडू लागलीत,पराभूत नेत्यांना प्रवाहात
 आनण्यासाठी वा आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी  क्रीडा क्षेत्रातही त्यांचा हस्तक्षेप होत असून
या बाबत  चिंतन करण्याची गरज आहे. ''राजकारण हे हरीचे नसून लहरीचे होत असते'' हे लक्षात ठेवले
पाहिजे.आय. ओ .एस  ने भारतीय ऑलम्पिक संघटनेमध्ये सरकारचा हस्तक्षेप होत असल्याचे
कारण देत संघटनेवर बंदी घातली आहे. मात्र या मुळे अंतर्गत वाद चवाटयावर येऊ लागले आहेत .
               जर बंदी आलीच तर अभिनव बिंद्रा हा भारताचा पहिला व शेवटचा सुवर्ण पदक विजेता ठरेल
 अशी काहीशी चर्चा हि कॉंलेज विश्वात सुरु होती. म्हणजे आता भारतीय ऑलम्पिकची इतिश्री झाली का ..?
                  हा प्रश्न उपस्थित  होतो. जवळजवळ अनेक खेळाडूनी आपले कॉंलेजचे शिक्षण सोडून 
ऑलंपिक पदकांवर लक्ष केंद्रित केले आहे  त्याचं करीयर बुडणार नाही हे मात्र खरे  असेल तरी आपल्या देशचा तिरंगा जगापुढे फडकविता येणार नसल्याची खंत त्यांच्यापुढे असेल.देशाअंतर्गत  नसले तरी देशाबाहेर तरी आपली लाज 
राखा अश्या काहीशा कडवट शब्दात आपली मते व्यक्त केली जात आहे.
                  अगदी परवापरवाचे उदाहरण घ्या ना पुण्याच्या मेरेथॉनचे. उद्घाटन अत्यंत दिमाखात झाले.
पण नियोजन कसे होते.नेत्याला सुरक्षेपासून सर्व व्यवस्था होती .पण खेळाडूंला धावण्यासाठी किती रस्ता 
मोकळा होता ..?  एकंदरित सरकारला अंतर्गत  हस्तक्षेप करून आपण आपली प्रतिमा बाहेरील  देशात मलीन करत 
असल्याची जाणीव नसावी हि विचार करण्याची गोष्ट आहे.
 
 भारतीय ऑलम्पिक  संघटनेचे अध्यक्ष अभयसिह चौताला व राष्ट्रकुल घोटाळ्यात नाव असले. 
तरी ललित भानोत  आपणा सर्वांकडून अपेक्षा आहे कि जे योग्य असेल ते जरूर करा .
पण खेळाडूंचाश्वास असलेली ऑलम्पिक स्पर्धे मधे  भारताचा  तिरंगा डौलाने फडकू द्या.
नाहीतर भारतीय ऑलम्पिकची इतिश्री दूर नाही . 
 
श्रीकांत बोरावके , दिनांक :- १२ जुलै २०१२
 
( समकालीन लेखन - पूर्व प्रसिद्धी प्रभात,कॉलेज कनेक्ट पुरवणी ,१४ जुलै २०१२ )