एकदा तरी अनुभवावा असा पालखी सोहळा यंदाहीमार्गस्थ होईल .आशिया खंडातील
सर्वात मोठा पायी वारी सोहळा म्हणून ज्याचा उल्लेख करावासा वाटतोतो संत
श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संततुकाराम महाराज पायी वारी पालखी
सोहळा होय.अत्यंत तळमळीने यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वैष्णावास पंढरीची
ओढ लागलेली असते आणि त्याच एका ओढीने मार्गावर चालताना त्यांना कसलाही
थकवा जाणवत नाही हे विशेष. त्याच प्रमाणे या वारीत चालणारे अनेख भक्त हे
हौसे,गौसे,नवसे असतात हे तितकेच खरे आहे.आपल्या रोजच्या जीवनापेक्षा
काहीतरी हटके व वेगळे करू इच्छिणारे तरुणही या वारीत सहभागी असतात आणि या
हि पेक्षा यात सहभागी असतो तो बळीराजा ज्याला आपले शेत पावसाच्या पाण्याने
चिंब भिजावे वाटते. अशी आर्जव घेऊन तो त्या वाटेला चालत असतो. वारीत असतात
लहान मुले ज्यांची भक्ती हि निर्लभ असते ज्यांचा प्रवास ज्या
निर्लभतेने सुरु असतो त्याच निर्लभतेने संपतो त्या सावळ्या कानड्या विठ्ठला
जवळ या बालकांचे काहीही मागणे नसते या मुळे ज्या आनंदी ते मुद्रेने यात
सहभागी असतात त्याच आनंदी मुद्रेने वारीच्या शेवटापर्यंत असतात.अशी हि वारी
प्रत्येकाला काही तरी बोध देणारी जगण्याची शिदोरी देणारी असते.आता हेच पहा
न वारीच्या प्रवासात ऊन,वारा,पाऊस आणि खडतर रस्ते लागतात यात कधी कधी
पायही थकतात पण क्षणभर विश्रांती घेऊन वारकरी पुन्हा वाटचाल सुरु करतात
कोणत्या आशेने तर त्या पंढरीच्या आशेने हेच तर जीवनाचे गमक आहे.आपले
ध्येय,जीवन कार्य एकदा ठरवले कि मग कितीही खडतर रस्ते येवोत पण आपल्या
द्येयापार्यंत पोहचायचेच हे शिकवणारी हि वारी आहे.वारी बरेच काही सांगून
जाते आपल्या वाटचालीत वारी समतेचा संदेश देते,वारी जाती अंताची आरोळी
देते.या वारीत विविध जाती धर्माचे लोक आस्थेने सहभागी होतात. इथे वेगळा
विदर्भ नसतो कि वेगळा कोकण इथे प्रत्येक जन आपण एकच वैष्णव आहोत .या
एकाच भावनेने एकरूप झालेला असतो याच मुळे कितीही जातीय दंगली घडवल्या तरी
हा महाराष्ट्र त्या दंगलिंला भिक घालत नाही तो समतेचा आणि पुरोगामित्वाचा
आपला वसा जोपासत राहतो.या वारीचा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण मद्य
आहे. महाराष्ट्र म्हंटल कि वारी आणि वारी म्हंटल कि महाराष्ट्र हे जणू
प्रत्येक पर्यटकाच्या विदेशी व्यक्तींच्या मनावर गोंदूनच गेले आहे. आजही
या वारीत परदेशी पर्यटक आस्थेने सहभागी होत असतात .
वारी अनेख संधी हि प्रधान करते नवे काही शिकण्याची,
रोजगाराची…पालखी मार्गावर भक्तांच्या सोयीसुविधा उपलब्ध करताना अनेख छोठे
छोठे व्यवसाय बेरोजगारांसाठी उपलब्ध होत असतात त्यातील येणारे उत्पन्न
निश्चितच नवा कायमस्वरूपी व्यवसाय उभारण्यासाठी उपयोगाचा ठरणारा
असतो.वारीबरोबर चालणारे अनेख भक्त आपला परंपरा गत व्यवसाय जोपासताना दिसून
येतात अगदी उल्लेखच करावासा झाला तर या वारीत सहभागी झालेले नाभिक
सामाज्याचे लोक ज्यांचा व्यवसाय हि जोपासला जातो आणि भक्तीभाव सुद्धा.हि
वारी कलेलाही दाद देणारी असते या वारीत काही ठिकाणी मुक्कामी तमाशा फडही
वारकर्यांच्या करमणुकी साठी असतात या बरोबरच वारीतील काही वारकरी भारुडही
सादर करतात एका अर्थाने वारी म्हणजे महाराष्ट्राची लोकसंस्कृती दाखवणारी एक
मोठी फेरीच असते जी समृद्ध महाराष्ट्राचा वसा आणि वारसा सांगते.अशी हि
सर्व गुण संपन्नवारी एकदा तरी अनुभवावी अशीच आहे. याच साठी प्रत्येक वैष्णव
मोठ्या आनंदाने म्हणत असतो ''माझी जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी'' .जी
आपल्या जीवाला आनंद,प्रेम आणि सुंदर प्रेमळ सहवास देते ती वारी आणि गुढी
रुपी झेंडा त्या पंढरपुरास नेईलच अशी भावना त्या प्रत्येक भक्तात असते जो
काम,क्रोध,लोभ,आणि मत्सर सोडून या वारीत चालत असतो.
: - श्रीकांत बोरावके
(प्रसिद्धी :- दैनिक जनप्रवास,पुणे २५-०६-२०१४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा