डीजे चालक कर्जबाजारी ; न्यायालयीन बंदीचा परिणाम
सद्या लग्नसराईचे दिवस अजून विवाह सोहळ्याशी निगडीत सारेच व्यवसाय आज
तेजीत असताना याला मात्र डीजे व्यवसाय अपवाद ठरत आहे.लाखो रुपये खर्च करून
प्रसंगी व्याजाने पैसे काढून उभा केलेला डीजे संच ऎन सिजन मध्ये बंद राहत
असल्याने या डीजे चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.एकी कडे
बेरोजगारीची स्थिती असतांना मात्र दुसरी कडे हि बंदी जुन्या पारंपारिक
व्यावसायांना पुनर्जीवन करणारी आहे.यामुळेच पारंपारिक ढोल ताशा व वादक
ताफ्याला सोन्याचे दिवस आले असून ढोल पथक तीस ते पन्नास हजारांपासून लाखो
रुपये वादन सुपारी घेत आहेत.ढोल पथका बरोबरच डफडी,सनई वादकांचा हि भाव
वाढला असून छोटे संच पाच हजार ते मोठे संच दहा ते पंचवीस हजार रुपये सुपारी
घेतांना दिसत आहेत
पाच वर्षांपूर्वी डीजे ला विशेष अशी मागणी
होती.परंतु मागणी जास्त पुरवठा कमी असल्याने डीजे चालक मना जोगी सुपारी
घेत.यामुळे या व्यवसायाची क्रेज तरुणांमध्ये निर्माण झाली.यामुळेच
व्यासायिक कर्ज व व्याजाने पैसे घेऊन,शेत जमीन विकून आलेल्या पैशातून हा
व्यवसाय करण्याकडे ओढा वाढला.शासकीय बंदी आणि वाढती व्यावसायिक स्पर्धा
यामुळे या व्यावसायाचा आज आर्थिक कणाच मोडला असून पन्नास ते ऐंशी लाख
रुपयांपासून एक ते दीड कोटी रुपयांपर्यंतची भांडवली गुंतवणूकच वसूल होणे
अवघड झाले असल्याने निव्वळ नफा हि या व्यावसायातून मिळताना दिसत नाही.त्यात
डीजे व्यावसायिक संघटीत नसल्याने त्यांचा बंदी विरोधातील आवाजही दबला जात
आहे.एका डीजे संचावर पाच ते दहा मुले काम करत असतात त्यांच्या रोजगारचा
प्रश्न हि बंदी मुळे उभा राहिला असून त्यांनाही बेरोजगार राहण्याची वेळ
येणार आहे.त्यात डीजे बंदी असतानाही चालविल्यास चालक व मालका सह सबंधित
विवाह सोहळ्यातील आयोजकांनवरही गुन्हे दाखल होत असल्याने बंदी विरोधात
जावून कोणीच डीजे लावण्यास तयार होत नाही. यामुळेच डीजे बंदी हा बेरोजगारीस
कारणीभूत ठरणारा मोठा विषय ठरू शकतो असा मत प्रवाह निर्माण होत आहे.उद्योग
नगरीलाही या बंदीची झळ बसणार असून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक डीजे
व्यावसायिक असलेल्या मोशी येथील तरुणांवर रोजगाराचाच प्रश्न उभा राहणार
आहे.मोशीतील डीजे व्यावसायिकांची संख्या पंधरा ते वीस च्या घरात असून
प्रत्येक व्यासायीकाकडे एक ते दोन डीजे संच आहेत.सद्य स्थिती मध्ये नियम व
अटींचे पालन करून डीजे वाजवले जात असून त्यांचीही संख्या नगण्य अशीच आहे . प्रतिक्रिया :-
निर्बंध मान्य ;सहकार्य हि हवे
मा.न्यायालयाने
घालून दिलेले डीजे बाबतचे निर्बंध सर्वांनाच मान्य असून त्या नियम व
अटींचे पालन करून व्यावसाय करण्यातही आमची ना नाही.परंतु नियमांचा नाहक
त्रास व भाडीमार न करता सहकार्याची भावना पोलिसांकडे असावी हीच अपेक्षा
आहे.पाठीत मारा पोटावर नको हेच सांगावेसे वाटते.
:- विजय हजारे ,डीजे व्यावसायिक ,मोशी - पिंपरी
:- विजय हजारे ,डीजे व्यावसायिक ,मोशी - पिंपरी
…. असे आहेत डीजे वर निर्बंध .
साधारणता डीजे वाजविण्यास पोलिस स्टेशनकडून परवानगीच दिली जात नसून रात्री दहा वाजे पर्यंत पारंपारिक वाद्य वाजविण्यासच परवानगी आहे.अशी माहिती मोशी पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर पुढारीशी बोलतांना दिली
( प्रसिद्धी दैनिक पुढारी,पिंपरी १२-०५-२०१५ )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा