श्रीकांत बोरावके
---------------------------------------------------------------------------------------------
(पूर्व प्रकाशित : दैनिक जनप्रवास ,पुणे १०-०५-२०१४)
---------------------------------------------------------------------------------------------
जगाचे पोट भरणाऱ्या बळीराजाला विरंगुळा
नसतो का ? कि त्याला मन नसतेच असेच असेल कारण मन असते तर त्याच्या या मनाचा
विचार निदान त्या प्राणी मित्र संघटनानी केलाच असता . प्राणी मित्र
संघटनांचे म्हणणे निदान तूर्तास खरे
मानू या... विचार करा ? आता बैल गाडा बंदी झालीच फेरविचार याचिका हि बळीराज्याच्या विरोधात गेली मग काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी एक शर्यतींवर अवलंबून असणारी आर्थिक घडी कोलमडून जाईल ,दोन या वर उभे राहिलेल्या ग्रामीण भागातील तरुणांचे लघु व्यावसाय बंद होतील ,तीन आणि अगदी महत्वाचे ज्या शेतकऱ्यांकडे शेतीचे सोडून इतर गाड्याची बैले आहेत त्यांचे पुनर्वर्सन कोठे व कसे करणार ,चार बाजारात ही बैलांची खरेदी मंदावेल, ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडेल मोठ्या प्रमाणात रक्कम लावून खरेदी केलेली बैले मातीमोल किंमतीत विकावी लागतील याचा फटका खिल्लार जमाती जोपासून उत्पन्न कमावणाऱ्या शेतकऱ्यांना होईल.अशा बैलांची निगा राखण्यासाठी वेतनावर काम करणारे मजूर बेकार होतील.शेतीची कामे करून फावल्या वेळेत शर्यतीत मग्न होणारे तरुण वाटा चुकतील कारण जीवनात केवळ कष्ठ हा एकच पर्याय समजणाऱ्या ग्रामीण तरुणांचा हाच विरंगुळा होता तोही बंद झाल्यावर इतर विरंगुळ्याच्या वाटा कोणत्या ? हो आणि सर्वात महत्वाचे या सर्वान मुळे ग्रामीण यात्रेचा परंपरेचा पारंपारिक ठेवा कायमचा हिरावणार आहे त्याच काय ? पुण्या मुबंईला स्थाईक झालेली ग्रामीण जनता निदान या यात्रेच्या काळात आपल्या गावाची वाट धरायचे ती वाट हि आता बद्दलली जाईल .

मा.सर्वोच्य न्यायालयाच्या
म्हणण्यानुसार पृथ्वी तलावर प्रत्येक प्राण्याला आपले स्वातंत्र्य अबाधित
राखण्याचा नैसर्गिक हक्क आहे . या मुळे कोणत्याही प्राण्याचा अमानुष छळ
कायद्याने गुन्हा आहे. आणि म्हणूनचं या विचारांचा आधार देत मा. सर्वोच्य
न्यायालय शर्यत बंदी करते आहे . परंतु या बंदीचा होणारे विपरीत परिणाम
न्यायलया समोर मांडायला हवेत ते असे कि इतक्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या
बैलांची शर्यत बंदी मुळे गरजच संपल्यावर त्यांचे पुनर्वर्सन कोण करणार
ज्या शासनाला अद्यापही गाईंचे पालनपोषण यथोचित पणे करता आले नाही ते
बैलांचे पालन पोषण कसे करणार. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या मशागती
साठी बैलांची गरज आता नगण्यच राहिली होती. त्यात त्यांचा वापर शर्यतीत होत
होता तो हि बंद झाल्यावर त्यांची काळजी कोण आणि कशासाठी घेईल.
स्वत: जाडे भरडे गहू खाऊन
बैलांना मैद्याची कणिक खायला घालून शर्यतीत उतरवणारा बळीराजा कोणाला दिसत
नाही,घरातील व्यक्ती मयत झाल्यावर ज्या प्रमाणे दु:खवटा पाळला जातो त्याच
प्रमाणे आपला शर्यतीतला बैल मयत झाल्यावर त्याची दशक्रिया आणि दु:खवटा
पाळणारा बळीराजा कोणाला दिसत नाही आणि घरात खायला मीठ नसतानाही बैलाची नीठ
निघा राखणारा बळीराजा तर कोणालाच दिसत नाही सर्वांना दिसतो तो अमानुष छळ
करणारा आणि केवळ बैलांचे हाल करणारा क्रूर शेतकरी या विदारक अवस्थेचा
सर्वांगाने विचार व्हायला हवा अन्यथा मिळालेला न्याय हा अन्याय वाटण्यास
वेळ लागणार नाही . प्राणी मित्र संघटनांची बाजू जरी विचारात घेतली
तरी काही राज्यांच्या प्रमाणात महाराष्ट्रात शर्यतीत बैलांचा छळ कमी
प्रमाणात होतो हे सत्य नाकारता येणार नाही . शर्यतीत काही प्रकार अत्यंत
सुंदर आणि छळ विरहित आहेत त्यांना तरी निदान या बंदीतून वगळायला हवे नाहीतर
कुठे तरी सर्वांचाच हिशोब चुकतोय असेच म्हंटल तर वावग ठरू नये . अर्थात
फेरविचार याचिकेवर मा.सर्वोच्य न्यायालय सर्व हिताचाच निर्णय देईल यात शंका
नाही .
(पूर्व प्रकाशित : दैनिक जनप्रवास ,पुणे १०-०५-२०१४)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा