
भविष्याच्या दृष्टीने गुंतवलेले पैसेच भेटेना : व्याजाने पैसे घेऊन गुजरान
श्रीकांत बोरावके : मोशी
आपल्या जमिनींची विक्री करून त्याच पैश्यांवर भविष्यात उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या डोळ्यात रुपी बँकेमुळे आज केवळ अश्रूच उरली आहेत.पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत समावेश झाल्या नंतर मोशीत हळूहळू स्थीत्यांतरे होत गेली येथील जमिनीला सोन्याचा भाव येऊ लागला.काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी नवी स्वप्ने पाहिली या उद्योगनगरी मध्ये सामावण्याची त्या साठी हक्काची जमीन विकून भविष्याच्या दृष्ठीने हा पैसा वापरता यावा यासाठी काही वर्षांसाठी तो ठेव म्हणून रुपी बँकेत ठेवण्यात आला.परंतु संचालकांच्या गैरव्यवहाराने रिझर्व्ह बँकेने 22 फेब्रुवारी 2013 पासून रुपी बँकेवर निर्बंध लादल्याने अनेक खातेदारांची आयुष्यभराची पुंजी या बँकेत अडकून पडली.त्या ठेवी काढताही येत नसल्याने मुलांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी व स्वत:च्या आजारपणासाठी देखील आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने व्याजाने पैसे घेऊन आपली कामे उरकण्याची वेळ या खातेदारांवर आली आहे.
कुठलीही चूक नसताना स्वत:च्या हक्काचे पैसे दिले जात नसल्याने त्रस्त झालेल्या रुपी बँकेच्या खातेदारांना आता दाद मागायची कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या दीड वर्षांपासून यावर राज्य शासन तोडगा काढत असून त्यावर कसलाच ठोस उपाय होताना दिसून येत नसल्याने अजून हा वनवास किती दिवस यावरच आत्मचिंतन करण्याची वेळ खातेदारांवर आली आहे.मोशी येथील बोऱ्हाडे वाडी,शिवाजी वाडी,सस्ते वाडी,लक्ष्मीनगर आदी ठिकाणच्या खातेदारांची रुपी बँकेच्या भोसरी शाखेत खाती आहेत.त्यात त्यांनी पाच लाखांपासून पन्नास लाखांपर्यंत ठेवी ठेवल्या आहेत.
रिझर्व बँकेने रुपीला सहा महिन्यांतून एकदा खातेदाराला एक हजार
रुपयांपर्यंत रक्कम देण्याचे आदेश दिले.असले तरी ते तटपुंजे आहे.व्याजाने
घेतलेल्या पैश्याचे व्याज देखील त्याने फेडता आले नाही.आता तर बॅंकेवरील
निर्बंध वाढविल्याने काहीच रक्कम निघत नाही.
एकंदरीतच सर्वच व्यवहार बँकिंग करण्याकडे सरकारची वाटचाल सुरु असताना अश्या प्रकारे डबगायीला आलेल्या बँकांच्या बाबतीत अपेक्षित कार्यवाही सरकार का करत नाही.केवळ आश्वासनांची खैरात करून खातेदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे प्रयत्न सुरु असून खातेदारांच्या भावनांची गांभीर्याने दखल घेताना कोणीच दिसत नाही.राष्ट्रीय बँकेत रुपीचे विलनीकरण करून लवकरात लवकर यावर या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी खातेदार करत आहेत.
एकंदरीतच सर्वच व्यवहार बँकिंग करण्याकडे सरकारची वाटचाल सुरु असताना अश्या प्रकारे डबगायीला आलेल्या बँकांच्या बाबतीत अपेक्षित कार्यवाही सरकार का करत नाही.केवळ आश्वासनांची खैरात करून खातेदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे प्रयत्न सुरु असून खातेदारांच्या भावनांची गांभीर्याने दखल घेताना कोणीच दिसत नाही.राष्ट्रीय बँकेत रुपीचे विलनीकरण करून लवकरात लवकर यावर या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी खातेदार करत आहेत.
स्वप्ने धुळीस मिळाली…
मुलीच्या लग्नासाठी
पाच वर्ष मुदतीवर मी रुपीच्या भोसरी शाखेत सात लाख रुपये गुंतविले
होते.परंतु गेल्या दीड वर्षांपासून बँकेचे व्यवहार ठप्प झाल्याने.मोठ्या
जोमात मुलीच लग्न करण्याच स्वप्न धुळीस मिळाल एनवेळी व्याजाने पैसे घेऊन
मुलीचे लग्न करावे लागल्याचे मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात राहणाऱ्या
महिलेने नाव न छापण्याच्या विनंतीवर सांगितले.
(पूर्व प्रसिद्धी पुढारी - पिंपरी - २९ मार्च २०१५ )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा