गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

न्यायव्यवस्थेत बदल हवा.....!
                              
                      सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे पेपर हतात घेतला आणि देश कुठेतरी थांबल्या सारखे वाटले.दिल्ली मधील घटना आपल्या पुण्यातील घटना किवा मुंबईतील घटना असो यावरून हे स्पष्ट होते कि २१ व्या शतकात देखील स्त्री सबला नाहीच.समाजात पुरुषांच्या खांद्याला खांदा  लावून काम करण्याची त्यांच्यात उर्मी आहेच तरीही  एका प्रकारच्या धुसर भीती खाली त्या अजूनही असल्याचे दिसून येते.असे का होते कारण  आमच्या देशात याबाबतच्या गुन्ह्यांवर कठोर शिक्षाच नाही.आणि असली तरी त्याची अंमल बजावणी जलद गतीने होतच नाही.                                                          
                                                          सोळाव्या वर्षी बलात्कार होतो
                                                          साठाव्या वर्षी तिला न्याय मिळतो
                                                           मिळालाच आरोपी तर ठीक....
                                                           नाहीतर संन्याशीच फाशी जातो.
 
हि आपल्या न्यायव्यवस्थेची पद्धत आहे.
                                                     देशात दर ५४व्या मिनिटाला एक बलात्कार तर २६व्या मिनिटाला एक विनयभंग २०व्या मिनिटाला एक अपहरण व १०व्या मिनिटाला एक छेडछाड होतच असते.असे हे सर्वेक्षणातील  आकडे बोलतात.काय हे..? 
                      जिथे विकासाची,उत्पनाची आकडेवारी कमी होताना दिसते तिथे मात्र या अश्या अपराधांचे आकडे वाढताना दिसून येतात बस्स आता तरी यावर वचक हवाच कायद्यात अशी शिक्षेची तरतूद हवी.कि असे गुन्हे करण्यात कोणी धजावणारच नाही.नाही तर पूजा जाधव प्रकणातील आरोपी हा पुराव्या अभावी निर्दोष सुटलाच नसता .इथे पुरावे ग्राह्य धरले जातात प्रत्यक्ष कृती नाही .यात सुधारणा आवश्यक आहे.
                    समानतेच्या बुरख्या खाली मासिक पगार आणणारी स्त्री जरी बाहेरून आनंदी दिसत असली तरी तिची पराधीनता लपत नाही ...वा ..लपविता येत नाही.
हे वास्तव आहे. आणि शासन कसल्या संरक्षणाची हमी देते.संरक्षण खरेच असते तर त्या कोवळ्या कळीला रिंकू पाटीलला शारधामातेच्या मंदिरात भर दिवसा सुर्यनारायणाच्या साक्षीने जाळले गेले नसते.हि विकृती नवे प्रवृत्ती आहे.स्त्री हि गुलाम असाह्य अबला,उपभोग्य वस्तू ,तिनी काळ परावलंबी ह्या अश्या शिकवणीतून बत्तीस शिराळ्याची आरती जोशी ,जळगावची सारिका, पुण्याची जानवी तुपे ,कागलची मानसी शहा ,मनमाडची सुनिता जोख्ररे, सांगलीची अमृता देशपांडे  जिच्यावर चित्रपट निघाला पण.. न्याय नाही. मुंबईच्या रस्त्यावर सर्वासमक्ष जाळले ती विद्या प्रभूदेसाई .या इतिहास जमा झाल्यातरी त्यांना न्याय मिळाला नाही .तर नव्यांची काय दशा ..!
                 केवळ इंडिया गेटच्या चॊथर्यावर मेणबत्या लाऊन ,वा पोटभर खाउन एकतास निषेद करून ,फेसबुक वर प्रतीक्रियाचा भडीमार करून, सरकारला नादान ठरून ,सर्वेक्षणाचे आकडे जाहीर करून भागणार नाही तर कायद्यात सुधारणा करून शिक्षेची अंमल बजावणी जलद गतीने व्हावी हि अपेक्षा आहे.
         अन्यथा लोकशाही असली तरी न''तोंड चालून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळवणे'' कधीही उत्तमच हे सूत्र अंगीकारनेच योग्य ठरेल का ?  
 
 
श्रीकांत बोरावके , दिनांक २० डिसेंबर २०१२ 

 ( वरील लेखाचा संपादित भाग प्रभात मध्ये २२ डिसेंबर २०१२ च्या कॉलेजकनेक्ट पुरवणीत प्रसिद्ध )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा