भारतीय ऑलम्पिकची इतिश्री ..........?
खर तर राजकारण्यांना आता क्षेत्र कमी पडू लागलीत,पराभूत नेत्यांना प्रवाहात
आनण्यासाठी वा आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातही त्यांचा हस्तक्षेप होत असून
या बाबत चिंतन करण्याची गरज आहे. ''राजकारण हे हरीचे नसून लहरीचे होत असते'' हे लक्षात ठेवले
पाहिजे.आय. ओ .एस ने भारतीय ऑलम्पिक संघटनेमध्ये सरकारचा हस्तक्षेप होत असल्याचे
कारण देत संघटनेवर बंदी घातली आहे. मात्र या मुळे अंतर्गत वा द चवाटयावर येऊ लागले आहेत .
जर बंदी आलीच तर अभिनव बिंद्रा हा भारताचा पहिला व शेवटचा सुवर्ण पदक विजेता ठरेल
अशी काहीशी चर्चा हि कॉंलेज विश्वात सुरु होती. म्हणजे आता भारतीय ऑलम्पिकची इतिश्री झाली का ..?
हा प्रश्न उपस्थित होतो. जवळजवळ अनेक खेळाडूनी आपले कॉंलेजचे शिक्षण सोडून
ऑलं पिक पदकांवर लक्ष केंद्रित केले आहे त्याचं करीयर बुडणार नाही हे मात्र खरे असेल तरी आपल्या देशचा तिरंगा जगापुढे फडकविता येणार नसल्याची खंत त्यांच्यापु ढे असेल.देशाअंतर्गत नसले तरी देशाबाहेर तरी आपली ला ज
राखा अश्या काहीशा कडवट शब्दात आपली मते व्यक्त केली जात आहे.
अगदी परवापरवाचे उदाहरण घ्या ना पुण्याच्या मेरेथॉनचे. उद्घाटन अत्यंत दिमाखात झाले.
पण नियोजन कसे होते.नेत्याला सुरक्षेपासून सर्व व्यवस्था हो ती .पण खेळाडूंला धावण्यासाठी किती रस्ता
मोकळा होता ..? एकंदरित सरकारला अंतर्गत हस्तक्षेप करून आपण आपली प्रतिमा बाहेरील देशात मलीन करत
असल्याची जाणीव नसावी हि विचार करण्याची गोष्ट आहे.
भारतीय ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष अभयसिह चौताला व राष्ट्रकुल घो टाळ्यात नाव असले.
तरी ललित भानोत आपणा सर्वांकडून अपेक्षा आहे कि जे योग्य असेल ते जरूर करा .
पण खेळाडूंचाश्वास असलेली ऑलम् पिक स्पर्धे मधे भारताचा तिरंगा डौलाने फडकू द्या.
नाहीतर भारतीय ऑलम्पिकची इतिश्री दूर नाही .
श्रीकांत बोरावके , दिनांक :- १२ जुलै २०१२
( समकालीन लेखन - पूर्व प्रसिद्धी प्रभात,कॉलेज कनेक्ट पुरवणी ,१४ जुलै २०१२ )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा