क्रिकेटचा ''भाऊ'' गेला.......!
भारतीय क्रिकेट विश्वातील 'विक्रमाचा बादशाहा' समजले जाणारे.जुन्यापिडीतील खेळाडू भाऊसाहेब निंबाळकर आज आपल्यात नाही.त्यांच्या जाण्याने तरुण खेळाडूंचा आधारवड हरपला असेच म्हणावे लागेल.
सद्या क्रिकेटला लागलेल्या ग्रहणाबद्दल त्यांच्या मनात सदै व खंत असायची.कसोटी संघात
स्था नन मिळूनही इतरांनला तीथ पर्यं त
पोहचवण्याचे कार्य या तपस्वीने केले.हा विक्रमवीर आपल्या आयु ष्यातील करीयर व जीवनातील सकारात्मक शिदोरी जाताजाता तरुण खेळाडूनाही देऊन
गेला.हार न मानता ध्येया पर्यं त पोहचण्याची सचोटी त्यांच्या जीवनातून पारखण्या जोगीच होती.
निवृत्त्ती नंतरही क्रिकेट तपश्चर्येला त्यांनी विरामही दि ला नाहीच परंतु सद्याच्या निवृत्त खेळाडूं सारखे इतरांच्या निवृत्त्तीचे भाकी तही वर्तवले नाही वा एखाद्याच्या खेळावर विनाकारण टिकाही केली नाही.आपल्या वेळेस नाबाद ४४३ धावांचा विक्रम त्यांनी नोंदवला व त्याच बरोबर प्रथमश्रेणी
सामन्यातील 'सर डॉंन ब्रॅडमन' चा ४५२ धावांचा विक्रम हि विरोद्धी सं घाच्या माघारीने होताहोता राहि ला.त्यांच्या क्रिकेट विश्वाती ल कामगिरी बद्दल कोल्हापूर मनपाने
त्यांना ''कोल्हापूरभूषण'' पु रस्काराने सन्मानित केले.राष्ट् रीय पातळीवरील ''सी.के.नायडू'' हा पुरस्काराही त्यांला सन्मानाने देण्यात आला. चित्त्या सारकी नजर व चपळाई
याचा ते खेळात उपयोग करत.उत्तमतोम फलंदाजा बरोबरच ते उत्तम गो लंदाजही होते.
प्रशिक्षक म्हणून या क्षेत्रात त्याचं योगदान गुरु पेक्षा भावासारके होते म्हणून त्यांची नाळ तरुणा ईशी जोडली गेली ती अखेर पर्यंत. !
खेळाडू हा नियम शेवट
पर्यंत जपत वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जगाचा निरोप घेऊन त्यांनी एक
खेळाची परिक्रमाच पूर्ण केली.
एकाद्या कुटुंबातील आदरणीय व मार्गदर्शन
करणाऱ्या व्यक्तींना भाऊ म्हंटले जाते तरुणाईचा क्रिकेट क्षेत्रातील
आधारवड,भावाप्रमाणे खेळाडूला
समजून घेण्याची वृत्ती यांमुळे त्यांच्या जाण्याने क्रिकेटचा भाऊ गेला असे म्हणणे वावगे न ठरावे...!
- श्रीकांत बोरावके,दिनांक १२ डिसेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा